कोपरगाव आरोग्य अधिकाऱ्यांचा रेमडेसिवीरचा दावा खोटा की, खरा ? ; हॉस्पिटलच्या नावे ३६ रेमडेसिवीर गेले कुठे?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव आरोग्य अधिकाऱ्यांचा रेमडेसिवीरचा दावा खोटा की, खरा ? ; हॉस्पिटलच्या नावे ३६ रेमडेसिवीर गेले कुठे?

कोपरगाव तालुक्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असुन,दैनंदिन रुग्णसंख्या शंभरी पार करत आहे.

राजकीय संघर्षात कुसडगाव एसआरपीएफ केंद्राचे लोकार्पण
कोठला परिसरात गोवंशीय मांसासह एकास अटक
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असुन,दैनंदिन रुग्णसंख्या शंभरी पार करत आहे.शासकीय रुग्णालयासह सर्वच कोविड सेंटर खचाखच भरलेले असुन सध्या एकही बेड तालुक्यात शिल्लक नसताना रेमडेसिवीर उपलब्धतेचा तमाशाही थांबता थांबत नाही. त्यात आज आत्मा मालिक हॉस्पिटलसाठी १२आणि श्री. जनार्दन स्वामी हॉस्पिटलला २४ रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाल्याचा माहीती तालुका आरोग्य आधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली. 

मात्र संबंधित दोन्ही हॉस्पिटल व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता आज एकही इंजेक्शन प्राप्त झालेच नसल्याची खात्री झाल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी धादांत खोटे बोलतात की हॉस्पिटलच्या नावे काही काळाबाजार सुरु आहे.अशी शंकेची पाल चुकचुकण्यास लागली आहे. तालुक्यात रुग्णसंख्येच्या तुलनेत कालपासुन रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नसुन काहींनी अल्पकाळात हात धुवुन घेतला आहे.काल दि.१२ रोजी केवळ श्री.जनार्दन स्वामी रुग्णालयाला नामदार जयंत पाटील यांच्याकडे धागेदारे लागल्यामुळे शंभर इंजेक्शन मिळाले होते.मात्र आज आत्मा मालिक हॉस्पिटलचे डॉ.अमित फरताळे आणि जनार्दन हॉस्पिटलचे डॉ.तुषार साळुंके यांनी एकही इंजेक्शन मिळालेच नसल्याचे सांगितले आहे.मात्र तालुका आरोग्य अधिकारी यांनी माध्यमांना शासकीय ग्रुपवरुन ही माहीती मिळाल्याचा दावा केला असला तरी तो धादांत खोटा असल्यामुळे जबाबदार अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीची सत्यता पडताळणे सध्यातरी गरजेचे आहे.

“आज आत्मा मालिक हॉस्पिटलला १२आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पिटलसाठी २४रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलेली आहे.तसा मेसेज शासकीय ग्रुपवर आलेला आहे.”

डॉ.संतोष विधाते तालुका आरोग्य अधिकारी,कोपरगाव

चौकट

तालुका आरोग्य आधिकारी बेजबाबदारपणे अशे विधान करणार नाही. मात्र त्यांच्या बोलण्यात सत्यता आसेल तर या ३६ इंजेक्शनचा या कोविड सेंटरच्या नावे काळाबाजार तर झाला नसेल हे तपासणे गरजेचे आहे.

COMMENTS