कोपरगावचा पाणी प्रश्‍न सुटणार – आ. आशुतोष काळे; 5 नंबर साठवण तलावाला 120 कोटींच्या खर्चाची तांत्रिक मंजुरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावचा पाणी प्रश्‍न सुटणार – आ. आशुतोष काळे; 5 नंबर साठवण तलावाला 120 कोटींच्या खर्चाची तांत्रिक मंजुरी

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी मैलाचा दगड ठरणार्‍या 5 नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी 120

रेवणनाथ महाराज म्हणजे चिरंजीव ऊर्जा
फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
 शिक्षकासह नगरपालिकेच्या कामगाराचा 26 जानेवारीला करणार  सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी मैलाचा दगड ठरणार्‍या 5 नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी 120 कोटी 12 लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील 5 नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे याबाबत आग्रही होतो. त्यासाठी आंदोलने केली वेळप्रसंगी आमरण उपोषण देखील केले मात्र सत्ता नसल्यामुळे माझे प्रयत्न अपुरे पडले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत कोपरगाव शहरातील नागरिकांना कोपरगाव शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचे वचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समक्ष दिले होते. त्यावेळी त्यांनी देखील माझ्या निर्णयाला सहमती दिली होती. त्यामुळे निवडून येताच पहिल्या दोनच महिन्यात 5 नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम पवार साहेबांच्या मदतीने पूर्ण करू शकलो. व पुढील कामासाठी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत होतो.
त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत असून नुकतेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभागाने 5 नंबर साठवण तलावासाठी व वितरीकांसाठी आवश्यक असलेल्या 120 कोटी 12 लाख रुपये खर्चाला तांत्रिक मंजुरी दिली आहे. याबाबत सविस्तर खुलासा करण्यासाठी उद्या बुधवार (दि.27) रोजी कोपरगाव येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

COMMENTS