केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडाला – अंबादास दानवे (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडाला – अंबादास दानवे (Video)

आज औरंगाबाद शहरात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली .2014 पासून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून देशात महागाईचा मोठा भडका उडाला असून याकडे

चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात – अंबादास दानवे
अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?
विखेंचे किती वीज बिल माफ केले, मग शेतकर्‍यांची वीज का तोडता ?

आज औरंगाबाद शहरात शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली .
2014 पासून केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून देशात महागाईचा मोठा भडका उडाला असून याकडे केंद्र शासन लक्ष देत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे,
केंद्र सरकारने केलेल्या कोणत्याच  घोषणेची पूर्तता  केली नाही, उलट 2014 ते 2021 पर्यंत जीवनावश्यक वस्तू सह इंधन दरवाढ व त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले असून, महागाईच्या भडक्यात सर्वसाधारण माणूस होरपळून  निघत आहे,
केंद्रा सरकारच्या अनेक धोरणामुळे महागाईचा भडका उडाला असून यासाठी केंद्र सरकारने कोणत्याहि  प्रकारच्या  उपाययोजना केल्या नाहीत,
आता या सर्व गोष्टींचा शिवसेना केंद्र सरकारला  जाब विचारणार असल्याचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

COMMENTS