केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र शासनाच्या बी.एस.एन.एल संचालक मंडळावर विधीज्ञ रवींद्र बोरावके यांची निवड

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : भारत सरकार उपक्रम अंतर्गत बी.एस. एन. एल. संचालक मंडळावर महाराष्ट्र राज्यातून येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व ज्योती पतसंस्

मयत तरुणांच्या कुटुंबाला आठ लाखाची मदत
संजीवनीचे 52 अभियंते एक्साईडच्या सेवेत दाखल ः अमित कोल्हे            
मनपाच्या 32 कोटींचा गैरवापर होऊ देणार नाही

कोपरगाव / ता.प्रतिनिधी : भारत सरकार उपक्रम अंतर्गत बी.एस. एन. एल. संचालक मंडळावर महाराष्ट्र राज्यातून येथील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व ज्योती पतसंस्थेचे अध्यक्ष, विधीज्ञ रविंद्र बोरावके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचेवतीने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी कारखाना कार्यस्थळावर सत्कार करण्यांत आला. बारावके यांच्या निवडीने कोपरगांवचा हा बहुमान असुन त्यांना देशपातळीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली असल्याचे बिपीनदादा कोल्हे म्हणाले.
              याप्रसंगी माजीमंत्री शंकरराव कोल्हे, तज्ञ संचालक व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रेय कोल्हे, कारखान्यांचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, रिपाईचे दिपक गायकवाड, शेतकरी संघाचे अंबादास देवकर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, विश्वासराव महाले, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, भास्करराव तिरसे, कैलास माळी, शिवाजीराव संधान, डॉ. गुलाबराव वरकड, विजय आढाव, नवनाथ आगवण अशोकराव भोकरे, कैलास संवत्सरकर, कामगारनेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, बाळासाहेब पान गव्हाणे, विक्रम पाचोरे, जयराम गडाख, अशोक आहेर, आदि उपस्थीत होते. 
         श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, आता खाजगीकरणामुळे स्पर्धा आहे. बी. एस. एन. एल. दूरसंचार जगभर मान्यता असलेली कार्यप्रणाली आहे. विधीज्ञ रवींद्र बोरावके यांचे निवडीने कोपरगावचा लौकीक देशपातळीवर झळकला. सत्कारास उत्तर देताना विधिज्ञ रवींद्र बारावके म्हणाले की, आपण ज्यावेळी भाजपाचा जिल्हाध्यक्ष झालो त्यावेळी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचेच सर्वप्रथम आर्शिवाद मिळाले अन् आताही निवड झाली तर संजीवनी कार्यस्थळावर त्याचेच हस्ते सत्कार हा योगायोग आहे. या संचालक मंडळात तांत्रीक सदस्यांबरोबरच देशभरातून दिव दमन, उत्तरप्रदेश, आसाम आणि महाराष्ट्र राज्यातील चार संचालकांचा समावेश आहे, विधिज्ञ रवींद्र बोरावके यांच्या भावी वाटचालीस अनेकांनी यावेळी सदिच्छा व्यक्त केल्या. शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले 

COMMENTS