कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मनोमिलनांचे प्रयत्न थांबले

Homeमहाराष्ट्रसातारा

कृष्णा कारखाना निवडणूक : तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मनोमिलनांचे प्रयत्न थांबले

पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित असणार्‍या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार हे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा गुर्‍हाळ अखेर संपुष्टात आल्यात जमा आहे.

जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया चक्क मध्यरात्रीपर्यंत होती सुरू
राज्यात कडक टाळेबंदीचे सूचोवाच ; मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार
किटकनाशकांच्या सुरक्षित वापरासाठी सूचना


कराड / प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित असणार्‍या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुरंगी की तिरंगी लढत होणार हे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा गुर्‍हाळ अखेर संपुष्टात आल्यात जमा आहे. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत रयत आणि संस्थापक या दोन पॅनेलची मनोमिलन होण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हात काढून घेतल्याचे स्वतः सांगितले आहे. त्यामुळे कारखान्यात तिरंगी लढतीचे स्पष्ट संकेत दिले गेले आहेत.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर ती दुरंगी का तिरंगी यामध्ये पासूनच चर्चेत आली होती. रयत पॅनलचे इंद्रजित मोहिते व संस्थापक पॅनलचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या अनेक बैठका चर्चा झाल्या. या बैठका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री विश्‍वजीत कदम, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांच्या मध्यस्थीने चालू होत्या. परंतू रविवारी रात्री झालेल्या बैठकीत कोणताच पर्याय निघत नसल्याने मनोमिलन प्रक्रियेतून आ. चव्हाण यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढील जे काही असेल ते कारखान्याचे सभासद आणि दोन्ही पॅनेलचे नेते निर्णय घेतील, असे त्यांनी जाहीर केले.

कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या मिळण्यासाठी काही अटी दोन्ही पॅनेलकडून पुढे आल्या होत्या. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जागा वाटपाचा तिढा शेवट पर्यंत सुटला नसल्याची माहिती समोर आली आहे. आ. चव्हाण यांनी या प्रक्रियेतून जाहीर केले असल्यामुळे आता डॉ. सुरेश भोसले यांचे सहकार पॅनेल, डॉ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत संघर्ष पॅनेल, आणि अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता दाट झाली. दोन्ही पॅनेलच्या मनोमिलनाची शक्यता संपुष्टात आलेली असल्याने दोन्ही पॅनेलनीं प्रचाराचे नारळ फोडले असल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS