अहमदनगर : प्रतिनिधीअहमदनगर रेल्वे स्टेशन मालधक्का येथे सहाशे माथाडी कामगार कार्यरत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न
अहमदनगर : प्रतिनिधी
अहमदनगर रेल्वे स्टेशन मालधक्का येथे सहाशे माथाडी कामगार कार्यरत आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपल्या जीवाची व कुटुंबीयांची पर्वा न करता शेतकऱ्यांसाठी अविरत खतांचा पुरवठा केला तसेच जिल्ह्यातील जनतेसाठी अन्नधान्याचा व सिमेंटचा पुरवठा केला हुंडेकरी व वाहतूकदार यांच्या आडमुठे धोरणामुळे सरकारी कामगार अधिकारी तथा सचिव अमदनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ यांनी दिलेल्या दरवाढीचा आदेश कामगारांनी मान्य केला. परंतु सरकारी आदेशाची हुंडेकरी व वाहतूकदार अंमलबजावणी करण्यास तयार नाही. हुंडेकरी व वाहतूकदार यांनी भ्रष्ट कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संगनमताने हमाल माथाडी कामगार संपावर आहे.
अशा खोट्या बातम्या पसरवून खोटी कागदपत्रे तयार करून मनमानी पद्धतीने वरिष्ठांकडे चुकीची माहिती पुरवली त्यामुळे अहमदनगरच्या रेल्वे मालधक्क्यावर येणाऱ्या जीवनावश्यक माल यामध्ये अन्नधान्य,खते,सिमेंट हे सर्व विळद, श्रीरामपूर,श्रीगोंदा या मालधक्क्यावर उतरविला जात आहे त्यामुळे अहमदनगर मालधक्क्यावर असलेल्या सहाशे माथाडी कामगारांन वर उपासमारीची वेळ आली आहे यास सर्वस्वी जबाबदार कृषी विकास अधिकारी शंकर किरवे हे आहेत
तरी यांच्या संपत्तीची चौकशी ताबडतोब करुन जिल्ह्याबाहेर बदली करावी अशी मागणी अहमदनगर जिल्हा सर्व कामगार संघटना फेडरेशनच्या वतीने करताना हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष क्रॉ. रमेश बाबू, नगरसेवक प्रशांत गायकवाड, कॉम्रेड गणेश कंदूर,कॉम्रेड.मधुकर पाटोळे,पोपट लोंढे,पंडित झेंडे, विलास उबाळे,दीपक रोकडे,सुरेश निरभवने, भैरवनाथ वाकळे,मेहबूब सय्यद, रामदास वागस्कर,संतोष निरभवणे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले की, अहमदनगर रेल्वेधक्यावरील सहाशे माथाडी कामगारांवर अवलंबून असणारे तीन ते चार हजार नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो,याची सर्वस्वी जबाबदारी हुंडेकरी माल वाहतूकदार व जिल्हा कृषी विकास अधिकारी शंकर किरवे हे कारणीभूत आहे.किरवे यांनी 20 ऑगस्ट रोजी खत व सिमेंट कंपन्यांची दिशाभूल करून खोट्या माहितीचे पत्र दिले की,हमाल माथाडी कामगारांचे संप सुरू आहे अशी खोटी माहिती दिली.
नगर रेल्वे स्थानक ते वीळद रेल्वे स्थानक अंतर 18 किलोमीटरचे असतानाही अधिकारी किरवे यांनी दोन किलोमीटर चे अंतर आहे अशी खोटी माहिती प्रशासनाला दिली, शकर किरवे यांनी हुंडेकरी व मालवाहतूक यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन नगर येथील मालधक्क्यावर काम करणाऱ्या सहाशे हमाल कामगारांवर त्यांनी अन्याय केला आहे. तरी किरवे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली.
COMMENTS