Homeताज्या बातम्याअहमदनगर

कुकडीच्या पाणीप्रश्‍नावर आंदोलन करणार्‍या चौघांना अटक

कुकडीच्या पाणी प्रश्‍नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दिनकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदे पोलिसांनी अटक केली आहे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचे जमावबंदी, संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी चौघा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीएसएनलच्या कार्यालयातून 3 लाखाचा माल चोरीला
BREAKING: भाजपच्या आमदाराचे चक्क कपडे फाडले! पहा ‘हा’
तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख

श्रीगोंदे/प्रतिनिधीः कुकडीच्या पाणी प्रश्‍नावर कुकडी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, जिल्हा परिषदेचे सदस्य दिनकर पंधरकर, प्रमोद जगताप, सुरेश भापकर या चौघांना श्रीगोंदे पोलिसांनी अटक केली आहे  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांचे जमावबंदी, संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी चौघा आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भापकर यांनी कुकडीच्या पाणी प्रश्‍नावर सुरू केलेल्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते विजयराव जावंधिया, प्रकाश पोहरे, सामाजिक कार्यकर्त्यां मेधाताई पाटकर, सेवानिवृत्त पोलिस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी पाठिंबा दिला होता. भापकर म्हणाले,की डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम आणि कुकडीचे आवर्तन 25 एप्रिलला सोडावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन केले आंदोलन करताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केलेले नाही. शेतकर्‍यांचा आवाज दडपण्यासाठी पोलिसांनी अटक केली; पण आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार आहे.

पोलिस निरीक्षक रामराव ढिकले म्हणाले, की कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर  संचारबंदी, जमावबंदीचे आदेश आहेत. आंदोलकांनी आंदोलन करून आदेशाचा भंग करू नये,  अशी नोटीस दिली होती; पण त्यांनी ऐकले नाही म्हणून कारवाई करणे भाग पडले

COMMENTS