काँग्रेस सेवा दला तर्फे पिंप्री जलसेनमध्ये गोरगरिबांना साखर वाटप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस सेवा दला तर्फे पिंप्री जलसेनमध्ये गोरगरिबांना साखर वाटप

पिंप्री जलसेन / पारनेर पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे काँग्रेस सेवा दलातर्फे गोरगरीब कुटुंबांना साखर वाटप करण्यात आली. खादी ग्रामोद्योग पारन

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवरच वाटचाल सुरु – आमदार मोनिका राजळे
कुकडी पाण्याबाबत दिवा विझण्यापूर्वीची धडपड बंद करावी : पप्पूशेठ धोदाड
 ’बाप्पाला पत्र ’ स्पर्धेत श्रीज्या मोहन रासकर सर्वप्रथम

पिंप्री जलसेन / पारनेर

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे काँग्रेस सेवा दलातर्फे गोरगरीब कुटुंबांना साखर वाटप करण्यात आली. खादी ग्रामोद्योग पारनेर चे चेअरमन हसनशेठ राजे व काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष नामदेव तांबे यांच्या तर्फे साखरेचे वाटप करण्यात आले. दिवाळीच्या सणासुदीला गोरगरिबांना साखर वाटप केल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.

       पिंपरी जलसेन पाणी फौंडेशनच्या मुख्य समन्वयक गीतांजली शेळके यांच्या हस्ते पिंप्री जलसेन मधील गोरगरीब कुटुंबांना काँग्रेस सेवा दलातर्फे साखर वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना गीतांजली शेळके म्हणाल्या की, काँग्रेस सेवा दलातर्फे गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग चे चेअरमन हसनशेठ राजे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार होत असून त्यांचे विशेष कौतुक आहे. समाजात अश्याच दानशूर व्यक्तींची गरज असून समाजातील लोकांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे असे मत सौ. शेळके यांनी व्यक्त केले. काँग्रेस सेवा दलातर्फे आतापर्यंत पारनेर तालुक्यातील अनेक गावांत दलित व गोरगरीब कुटुंबांना समाजपयोगी व दैनंदिन संसार उपयोगी साहित्य वाटप केले असल्याचे काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष नामदेव तांबे यांनी सांगितले. यावेळी पिंपरी जलसेनचे माजी सरपंच लहू थोरात, उद्योजक धोंडिभाऊ पुजारी, स्वस्त धान्य दुकानदार यशवंत अडसरे, तुकाराम कदम, फिरोज राजे, दगडू बोरुडे आदी उपस्थित होते. यावेळी पिंपरी जलसेनमधील गरजू व गोरगरीब कुटुंबांना साखर वाटप करण्यात आली. सणासुदीच्या काळात साखर मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.

COMMENTS