कवठे- केंजळ रस्ता गेला खड्ड्यात … ; अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने ग्रामस्थांचा संताप

Homeमहाराष्ट्रसातारा

कवठे- केंजळ रस्ता गेला खड्ड्यात … ; अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने ग्रामस्थांचा संताप

पुर्नवसित केंजळ (कवठे), ता. कराड ते जोतिर्लिंग विद्यालय कवठे हा कवठे-मसूर रस्त्याला जोडणारा सुमारे एक किमी रस्ता वहातूकीच्या दृष्टिने अतिशय खराब झाला आहे.

सर्वसामान्यांना दिलासा !
गुंजवणी बंद जलवाहिनीचे काम जोमात
काही आमदार खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे- बच्चू कडू

मसूर / वार्ताहर : पुर्नवसित केंजळ (कवठे), ता. कराड ते जोतिर्लिंग विद्यालय कवठे हा कवठे-मसूर रस्त्याला जोडणारा सुमारे एक किमी रस्ता वहातूकीच्या दृष्टिने अतिशय खराब झाला आहे. संबंधीत विभागाने याची पहाणी करुन तो तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

या रस्त्याची गेली कित्येक वर्षे डागडुजी करण्यात आली नसल्याने या रस्त्यावर मोजता येणार नाहीत एवढे खड्डे पडले आहेत. या रस्त्याला एखाद्या ओढ्या-नल्यासारखी अवस्था झाली आहे. रस्त्यावरून जाता-येताना वहानधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच खड्ड्यामुळे अनेकांना मनक्याचे विकार झाले आहेत. रस्ता असाच राहिला तर पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कवठे गावच्या हद्दीत केंजळ हे गाव पुनर्वसित झाले आहे. पुर्नवसित गावांना शासन सर्व सोयीसुविधा देत आहे. मग केंजळ या गावासाठी शासन दुजाभाव का करत आहे? 

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद यादव म्हणाले, संबंधीत विभागाने या रस्त्याची पहाणी करुन तातडीने हा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करावा. येथील ग्रामस्थ गेल्या काही महिन्यापासून या रस्त्यासाठी आवाज उठवत आहेत. तसेच सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, तहसिलदार कराड, जिल्हा परिषद यांना याबाबत लेखी पत्रही देण्यात आले आहे. परंतू यावर आतापर्यंत कसलीही कारवाई झाली नाही. तरी संबंधीतांनी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन दळणवळण सुकर करावे व ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

COMMENTS