कर्म सिध्दांत पोलीस अधिक्षक मनोज पाटलांचा!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्म सिध्दांत पोलीस अधिक्षक मनोज पाटलांचा!

जन्माला आलेल्या माणसाचा भोग कधी चुकत नाही.तुम्ही कुठल्याही कुळात जन्माला आलेला असा,तुमच्या हातून नियतीला हवे ते कर्म करून घेतलेच जाते,तोच असतो तुमचा

सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील
अमरावतीमध्ये धडकला जन एल्गार मोर्चा
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

जन्माला आलेल्या माणसाचा भोग कधी चुकत नाही.तुम्ही कुठल्याही कुळात जन्माला आलेला असा,तुमच्या हातून नियतीला हवे ते कर्म करून घेतलेच जाते,तोच असतो तुमचा कर्म सिध्दांत.अहमदनगरचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील हे ही या नियतीच्या पठडीतील कर्म सिध्दांताला अपवाद नाहीत.अहमदनगर सारख्या जिल्ह्याचे पोलीस पालकत्व निभावणे एव्हढे सहज सोपे नाही,हे एव्हाना पोलीस अधिक्षकांच्या लक्षात आलेच असेल,तथापी कर्म सिध्दांतावर विश्वास असलेल्या माणूस आपल्यावर पडलेल्या प्रत्येक जबाबदारीकडे नियतीची इच्छा पुर्ण करायची आहे  या निर्धाराने पाहत असतो आणि यशस्वीही ठरतो.मनोज पाटीलही या कर्म सिध्दांताला अपवाद नाहीत.
एव्हढी वर्ष पत्रकारीता करीत असतांना समाजात अनेक माणसं भेटली,पत्रकारीतेसोबत समाजकारण आणि थोड्याफार प्रमाणात राजकारणाशी संबध आला.समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्र वगळून पत्रकारीता करता येत नाही.आणि या दोन्ही क्षेत्राचा नित्य संबंध येणारे शासन प्रशासन पत्रकारीतेला वर्ज्य ठेवता येत नाही.याचाच अर्थ पत्रकारीता करता करता या सर्वच क्षेत्रातील विविध गुण अवगुणांनी ओतप्रोत  भरलेली असंख्य माणसं भेटली.अनेकांना जवळून वाचण्याचा अनुभव आला,अनेकांनी मनावर कायमच्या जखमा कोरल्या तर अनेकांनी मनावर कायम स्वरूपी आठवणींची मोहोर उमटवली,अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून आमच्यासारख्या पत्रकारीतेत तावून सुलाखून निघालेल्या अनेकांवर कायमची छाप पाडली,आपल्या अहमदनगर जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर कृष्णप्रकाश यांच्यासारखा पोलीस अधिक्षक या जिल्ह्याला लाभला आहे,त्यांचीच परंपरा पुढे नेत असतांना पोलीस अधिक्षक या पदाची प्रतिष्ठा आणखी चकचकीत करण्याची जबाबदारी मनोज पाटील यांच्या खांद्यावर आहे.अहमदनगर आणि शेजारचा नाशिक हे दोन्ही जिल्हे नाशिक परिक्षेत्रात विविध कारणास्तव नेहमीच चर्चेत असतात.तसे गेले सहा सात महिन्यांपासून ही चर्चा पुन्हा प्रवाहीत झाल्याचे दिसते.या प्रवाहाचा उगम अर्थातच पोलीस अधिक्षक कार्यालय राहीले हेही विशेष.पोलीस अधिक्षकपदाचा कार्यभार सांभाळतांना या दोन्ही पोलीसांच्या पाटलांनी कर्तव्याला प्राधान्य देतांना झारीतील शुक्राचार्यांना कायद्याच्या छिद्रातून युक्तीने बाजूला सारून सामान्य जनतेचे व्यापक हित जपले.पोलीस खात्यात नोकरी करणे सुळावरची पोळी राखण्यापेक्षाही अवघड बाब आहे याचा अनुभव या दोन्ही पाटलांनी घेतला आहे,नाशिक जिल्ह्याच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्याचा एकूण स्वभाव वेगळा आहे.महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर अहमदनगर जिल्ह्यातील मातब्बर राजकारण्यांचा प्रभाव आहे.हा प्रभाव खरेतर माज प्रशासकीय यंत्रणेवर नेहमीच हावी होतांना आपण पाहीला आहे.याआधी कृष्ण प्रकाश यांनी हा माज उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला,त्यानंतर ही जबाबदारी परंपरा म्हणून पोलीस अधिक्षक मनोज पाटील लिलया पार पाडतांना दिसतात.अर्थात काम करणाऱ्या माणसाकडून चुकाही होतात.अशा चुका मनोज पाटील यांच्याकडूनही झाल्या असतील.मात्र त्यात दुरूस्ती करून पुढे जाण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला आहे हे या ठिकाणी मुद्दामहून नमूद करावे लागेल.या आधी म्हटल्यांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचा राजकीय माज जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील गुन्हेगारीला पोसते हा आजवरचा अनुभव आहे.गुन्हेगारी मोडीत काढतांना हाच माज पोलीस खात्याला अडचणीत आणण्यासाठी साम दाम दंड आणि सर्वात शेवटी भेदनिती  वापरून खच्चीकरण करतो,हे चित्र जिल्ह्यात रूढ होते.कृष्णप्रकाश यांनी हे चित्र धुवून काढले.मनोज पाटील यांनी हाच परिपाठ पुढे नेतांना अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या कारकिर्दीतील भयानग प्रकारातील गुन्हेगारीच्या मुसक्या बांधल्या.होय! रेखा जरे हत्याकांड! या हत्याकांडाला अनेक कंगोरे आहेत.राजकीय सामाजिक आणि पत्रकारीतेतील तथाकथित प्रतिष्ठीतांच्या चेहऱ्यावर असलेला सज्जनतेचा बुरखा बुरखा मनोज पाटील यांनी टरटरा फाडला.त्यांच्या या कामात पोलीस उपअधिक्षक अजित पाटील,संदीप मिटके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पो.निरिक्षक अनिल कटके यांचा मोलाचा वाटा आहे हे देखील नमूद करणे क्रमप्राप्त आहे.रेखा जरे हत्याकांडाचा तपास मनोज पाटील यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरावा.या प्रकरणात समाजसेवेची शाल अंगावर पांघरूण पत्रकारिता करणारा एक नराधम आणि त्याला पाठीशी घालणारे उत्तर दक्षिणेतील राजकीय वतनदार यांच्याशी सामना करायचा होता,या मंडळींचे खबरे पत्रकारीता आणि पोलीस खात्यातही पेरले गेले होते.त्यांचे जाळे उध्वस्त करून या प्रकरणाला कायद्याच्या चौकटीत न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे,याशिवाय जातीय राजकारणाचा शाप आणि त्यातून होणारा जातीय अत्याचार अशा गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हानही मनोज पाटील यांच्यासमोर होते आणि आहे.यातही ते यशस्वी होतांना दिसत आहेत.वर उल्लेख केलेल्या  पोलीस अधिकाऱ्यांसह तोफखाना पोलीस ठाण्याचे गडकर, कोतवालीचे मानकर,नगर तालुक्याचे सानप,भिंगार कॕम्पचे देशमुख,एमआयडीसीचे आठरे,यांच्यासह मुकूंद देशमुख,अभय परमार यांच्यासारख्या जिल्ह्यातील ठिकठिकाणी सेवारत असलेल्या पोलीस निरिक्षकांच्या माध्यमांतून कायद्याचा धाक जमविण्यात मनोज पाटील यशस्वी झाले आहेत,अर्थात पोलीस अधिकारी  हा कधीच यशस्वी झाला असे म्हटले जात नाही,आज एक काम फत्ते केले की उद्या दुसरे आव्हान समोर उभे असते रोज नवनव्या आव्हानांशी सामना असतो.काम संपत नाही म्हणून यशस्वी झाले असे म्हणता येत नाही,तथापी कर्तव्य परायण अधिकारी सतत झटत असतो,आणि आपल्या कर्म सिध्दान्ताचा अध्याय लिहीत असतो या धारणेवर कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांना जिल्ह्यातील गुन्हेगारीचा स्रोत असलेल्या अवैध धंद्यावर कारवाईचे बळ मिळण्यासाठी शुभेच्छा.

ReplyForward

COMMENTS