कर्जत नगरपंचायतीकडून ६० टपरीधारकांची मालमत्ता होणार सील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतीकडून ६० टपरीधारकांची मालमत्ता होणार सील

कर्जत : प्रतिनिधी कर्जत नगरपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या ६० टपरीधारकांचे भाडे अनेक वर्षापासून थकीत असल्याने प्रशासनाकडून त्यांना नोटिसा बजावण्य

न.पा. शाळेत जागतिक शिक्षक दिन साजरा
मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे
खर्डा आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत नगरपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या ६० टपरीधारकांचे भाडे अनेक वर्षापासून थकीत असल्याने प्रशासनाकडून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. थकीत रकमेच्या वसुलीबाबतचा दावा पूर्व तडजोड करण्यासाठी नगरपंचायतीने तालुका विधी सेवा समितीच्या लोकन्यायालयात ठेवला होता. मात्र त्यामध्ये तडजोड न झाल्याने नगरपंचायतीने ७ दिवसांच्या आत भाडे न भरल्यास अखेर टपरीधारकांच्या मालमत्तेस अटकाव करण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतकडून टपरीधारकांची मालमत्ता सील करण्याची ठोस कारवाई होणार आहे.

मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सुरुवातीला भाड्याची थकीत रक्कम असलेल्या टपरीधारकांना कर भरण्याबाबत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र टपरीधारकांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी टपरीधारकांना कळवून हा वाद २५ सप्टेंबर रोजी लोकन्यायालयात ठेवला. मात्र नगरपंचायतीच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी टपरीधारकांना आपण लोकन्यायालयात हजर राहिले, पण त्याबाबत काहीही चर्चा न केल्याने थकीत रकमेबाबत तडजोड होवू शकली नसल्याचे कळवले.

त्यामध्ये थकीत रक्कम ७ दिवसात भरणा करावी अन्यथा महाराष्ट्र नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५५ नुसार मालमत्तेस अटकाव केला जाईल. संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत टपरी सुरु करता येणार नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे नगरपंचायतीने भाडे वसुलीसाठी मालमत्ता सील करण्याची निर्णायक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

COMMENTS