कर्जत उपविभागीय क्षेत्रात अवैध व्यवसायांना कुणाचा आशिर्वाद ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत उपविभागीय क्षेत्रात अवैध व्यवसायांना कुणाचा आशिर्वाद ?

अहमदनगर प्रतिनिधी :अहमदनगर जिल्ह्यात  असलेल्या तालुक्यांत दक्षिणेतील कर्जत श्रीगोंदा आणि मराठवाड्याचे प्रवेशव्दार असलेले म्हणजे संताच्या वास्तव्याने

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे : पावसे
नेवासेतील महसूल खात्याचा सावळा गोंधळ
कु. गुंजन अग्रवालचा सत्कार

अहमदनगर प्रतिनिधी :अहमदनगर जिल्ह्यात  असलेल्या तालुक्यांत दक्षिणेतील कर्जत श्रीगोंदा आणि मराठवाड्याचे प्रवेशव्दार असलेले म्हणजे संताच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी.कर्जतचे संत गोदड महाराज, जामखेडचे नागेश्वर मंदिर, जामखेड तालुक्यातील चौंडीचे आहील्यादेवी होळकरांचे श्रद्धास्थान तर श्रीगोंदा तालुक्यात असलेले महम्मद महाराजयांची पवित्रभूमीचा सध्या येथील अवैध व्यवसायांच्या गटारगंगेच्या दुर्गंधाने श्वास गुदमरला आहे.      महाराष्ट्र सरकारमधील सिंहाचा वाटा असणारी पवार कुटुंबातील तिसरी पिढी कर्जत जामखेडचे प्रतिनिधित्व करत असतानाही येथील अवैध व्यवसाय जोमात असल्यामुळे कदाचित हास्यास्पद वाटेल मात्र सत्य कटु असते ते नाकारता येत नाही.येथे सध्या खाजगी सावकारी, वाळू तस्करी, जूगार, मटका दारू,आणि नर्तीकांचा  कलाकेंद्रातुन चाललेला नाच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय देणारा ठरत आहे.या व्यवसायांना नेमका कुणाचा आशीर्वाद आहे याचा शोध पोलिस अधिक्षकांनी घेण्याची  सध्यातरी गरज आहे.       धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्यांची कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी येथील कर्जय उपविभागिय कार्यालयावर आहे.कोरोनाचे नियम थोडे शिथिल केल्यामुळे येथे वर्दळही वाढली आहे.मात्र सध्या या पावन भूमीत  अवैध व्यवसायांने येणाऱ्यांचा जिव गुदमरत असल्याचे वास्तव नजरेआड करुन चालणार नाही . कोरोनाकाळातही जामखेडच्या कलाकेंद्रातील घुंगरांचा आवाज कुणाच्या आशीर्वादाने राज्याला भुरळ पाडत होता.याचे उत्तर  पोलिस प्रशासनाने द्यावे       अवैध व्यवसायातुन गुन्हेगारीला पोषक वातावरण निर्मिती होते.या व्यवसायांना लगाम  लावण्यासाठी ज्यांचेकडे कायद्याचे अस्र आहे .ती यंत्रणा कुचकामी ठरत पोलिसांकडून अवैध व्यावसायिकांचा सदैव पाहुणचारच होत असल्याची नागरीकांत कुजबुज आहे.शहरातील ठेल्यांवर, हॉटेलमध्ये बेकायदा अवैध दारू राजरोसपणे सुरू आहेत. खुलेआम मटका,बिंगो लॉटरी ,रस्तालूट,वाळु तस्करी आणि जुगार स्थानिक पोलिस दादांच्या आशिर्वादाने सुरूच असल्याचे चित्र आहे. पोलिस ठाण्यातीलच काही कर्मचार्‍यांचे या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक हितसंबंधच नव्हे तर मासिक हप्तेखोरीच असल्याची नागरीकांची चौकाचौकात चर्चा आहे.मात्र नेमके हे सारे कुणाच्या आशिर्वादाने चालते हा प्रश्न पोलिसांना मृगजळासमान वाटत असला तरी जाणकार जनतेला यातुन हात ओले करणारे चांगलेच ठाऊक आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रात समाजसेवी संघटना,कार्यकर्ते अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी निवेदने देतात,प्रसंगी उपोषण करतात चार दिवस धंदे बंद केले जातात.तक्रार करणारा आपराधी भूमिकेत वावरतो त्याला भयाच्या सावटाखाली वावरावे लागते ,त्याच्या अंगावर अवैध व्यावसायिकांची झुंड तुटुन पडते यामुळे पुन्हा या अवैध धंद्यांच्या विरोधातआवाज उठविण्यास पुढे कुणी सरसावत नाही. जिल्हा पोलिस अधिक्षक चार भितींच्या आत माध्यमांसमोर अवैध व्यवसाय बंदीचे फर्मान काढतात मात्र नव्याचे नऊ दिवस अशी नागरीकांची धारणा झालेली आहे.सर्वसामान्य व्यक्तीसाठी हरघडीला खाकी वर्दीचा कायदा अवैध व्यवसायांच्या हितासाठी कायमच का नजरेआड केला जातो.हा प्रश्न प्रत्येक नागरीकास पडलेला आहे.    अहमदनगर जिल्ह्याला मनोज पाटील यांच्या रुपाने खरोखर एक पारदर्शक कारभाराची धुरा सांभाळणारे कर्तव्यतत्पर अधिकारी मिळाले आहे.अनेक गुन्ह्यात त्यांची कामगिरी चांगली आहे.त्यांचा हेतू चांगला असला तरी त्यांच्याच प्रशासनातील लोभी अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवैध व्यवसायांच्या माध्यमातून माया गोळा करण्याचा अपद्व्याप सुरु केलेला असल्यामुळे यातुन नकळत पोलिस अधिक्षकांची प्रतिमा मलिन होण्याची दाट शक्यता आहे. अवैध धंदे रोखण्याची स्थानिक पोलिसांसह  अधिकार्‍यांचीही मानसिकता मुळीच दिसून येत नाही.या काळ्या कर्तृत्वाचे पाढे गिरवले जात असतानाही पोलिस अधिक्षक याकडे दुर्लक्ष करणार असतील तर नागरीकांच्या मनात पोलिस अधिक्षकांचीही प्रतिमा डागळली जाईल हे निश्चित.  या बोकाळलेल्या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत चालली  असुन ग्रामीण भागात सायंकाळनंतर तालिबानी साम्राज्यात वावरत असल्याचा भास होणे साहजिक आहे. याबाबद पोलिस आधिक्षक कठोर भूमिका घेऊन अवैध व्यवसाय आणि त्यांना पोसणारे कर्जत उपविभागिय कार्यालयातील आधिकारी कर्मचारी यांचा चांगलाच समाचार घेतील हिच सर्वसामान्य नागरीकाची अपेक्षा आहे.                   

जिल्ह्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्तीची व्हावी

सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवुन त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध असलेले पोलिस प्रशासनातील विभागिय अधिकारी आणि कर्मचारी यांची दरमहा लाखो रुपयांच्या उलाढालीने साधा पोलिस शिपाई देखील चारचाकीशिवाय फिरत नाही इतकी माया कशी गोळा केली गेली यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमावलेल्या अवैध संपत्तीचे मुल्यमापन होणे गरजेचे आहे.

COMMENTS