कर्जतच्या तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतच्या तहसीलदारांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

संजय गांधी निराधार योजनेमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप करुन

कृषीदूतांनी ड्रोनद्वारे केले कीटकनाशकांची फवारणीचे प्रात्यक्षिक
रोहमारे महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
कृषी कायद्यावर स्थगिती असतांना आंदोलन कशासाठी ? : सर्वोच्च न्यायालय | DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेने शासकीय रकमेचा अपहार केल्याचा आरोप करुन,सदर प्रकरण दडपणार्‍या कर्जत तहसीलदारवर शिस्तभंगाची कारवाई कर ण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे,पारनेर तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, उपा ध्यक्ष आकाश वाबळे,नामदेव धरम आदी सहभागी झाले होते.या उपोषणाची योग्य दखल घेतली गेली नसल्याने संघटनेने महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

संजय गांधी योजनेमध्ये अपहार झाला असून, लेखापरीक्षण ऑडिटमध्ये सदर प्रकरण उघडकीस आले आहे.मात्र या रकमेचा अपहार दडपण्याच्या दृष्टीकोनाने कर्जतचे तहसिलदार नानासाहेब अडागळे यांनी प्रयत्न केला आहे.पारनेर तालुका सैनिक बँकेशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे कर्जत तहसिलदार त्यांना पाठिशी घालून शासनाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप आहे. कर्तव्यात कसूर करणारे व शासनाची दिशाभूल करणार्‍या कर्जत तहसिलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्यासाठी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचा दीड वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. यासाठी संघटनेने दहा वेळा उपोषण करुन पाठपुरावा केला.मात्र त्यांना वेठीस धरुन त्यांची दखल घेण्यात आली नसल्याचे म्हंटले आहे.यासाठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी संगमनेरला संघटनेने पुढील उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.

COMMENTS