औषधांच्या निर्यातीत 18 टक्क्यांची वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औषधांच्या निर्यातीत 18 टक्क्यांची वाढ

देशातून औषधांची निर्यात 18 टक्क्यांनी वाढून 24.44 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे.

अमोल किर्तीकरांना ईडीचे दुसरे समन्स
वॉटर टँकमध्ये आढळला अभियंता तरुणीचा मृतदेह
कामावरुन काढल्याच्या रागातून मालकिणीला जिवंत जाळलं अन् स्वतःही जळाला

नवी दिल्लीः देशातून औषधांची निर्यात 18 टक्क्यांनी वाढून 24.44 अब्ज डॉलर्सवर पोचली आहे. म्हणजे ती सुमारे एक लाख 76 हजार कोटी रुपयांची निर्यात झाली. मागच्या वर्षी भारताने 20.58 अब्ज डॉलर्स (सुमारे एक लाख 48 हजार कोटी रुपयांची) ची निर्यात केली. 

फार्मास्युटिकल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया (फामक्सिल) चे महासंचालक उदय भास्कर यांनी म्हटले आहे, की या वर्षी मार्च महिन्यात देशातील फार्माची निर्यात 2.3 अब्ज डॉलर किंवा 16 हजार 560 कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील कोणत्याही महिन्यातील हा सर्वाधिक निर्यातीचा आकडा आहे. परिषदेच्या म्हणण्यानुसार मार्चची आकडेवारी प्राथमिक आहे. या वर्षी मार्चमध्ये फार्मा निर्यातीचा विकास दर मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत 48.5 टक्के जास्त आहे. मार्च 2020 मध्ये फार्माची निर्यात 1.44 अब्ज डॉलर होती. हा वाढीचा दर असा आहे, जेव्हा जगभरातील फार्मा मार्केटमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी लागू केल्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला होता, असे उदय भास्कर यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी जागतिक औषधी बाजारामध्ये 2 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदली गेली. याउलट वर्षभरात भारतातून ड्रग्जच्या मागणीत जोरदार झेप घेतली. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या औषधांची भारतातली गुणवत्ता आणि व्यावहारिकता जगभरातील ग्राहकांसाठी चांगली होती. भारतातून लस निर्यातीत चांगली वाढ दिसून येत आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारच्या उत्पादन-आधारित प्रोत्साहन म्हणजेच पीएलआय योजनेमुळे आयातीवरील अवलंबन कमी होईल आणि औषध क्षेत्रातील निर्यातीत वाढ होईल. उत्तर अमेरिका ही फार्मास्युटिकल औषधांसाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि गेल्या आर्थिक वर्षात हे प्रमाण 34 टक्के आहे. 

सर्वाधिक निर्यात कॅनडात

दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठांमध्ये भारतीय औषधांच्या निर्यातीत 28 टक्के आणि युरोपियन बाजारात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशांच्या बाबतीत सांगायचे झाले तर निर्यातीत सर्वाधिक 30 टक्के वाढ कॅनडाच्या बाजारपेठेत नोंदली गेली. गेल्या आर्थिक वर्षात मेक्सिकोने एक वर्षा पूर्वीच्या तुलनेत 21.4 टक्के अधिक औषधे आयात केली. त्याच बरोबर, एका वर्षा पूर्वीच्या तुलनेत भारताने 12.6 टक्के अधिक

निर्यात केली.

COMMENTS