औद्योगिक क्लस्टरच्या अडचणी केंद्र सरकार सोडवणार : गड़करी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औद्योगिक क्लस्टरच्या अडचणी केंद्र सरकार सोडवणार : गड़करी

ग्रामीण व शहरी उद्योजकांकडून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

शासकीय औद्योगिक संस्थेत विद्यार्थ्यांनी गिरवले योगाचे धडे
६५ तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्राचे वाटप
संगमनेर तालुक्यात वेश्या व्यवसायावर छापा

अहमदनगर/प्रतिनिधी- ग्रामीण व शहरी उद्योजकांकडून क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास व्हावा, यासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महाऔद्योगिक क्लस्टर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रकाश लोळगे व सचिव सोमनाथ गोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंंडळाने नुकतीच नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन औद्योगिक क्लस्टरच्या समस्या मांडल्या. त्या सोडवण्याच्यादृष्टीने गडकरी यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांना आदेश दिले असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष लोळगे यांनी दिली. 

याबाबत लोळगे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना (एमएसआय-सीडीपी) या योजनेंतर्गत महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील जवळपास 28 क्लस्टर सुरु असून 56 पेक्षा जास्त सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या क्लस्टर योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागातील छोट्या उद्योग उपक्रमांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास होत असून तसेच प्रत्येक क्लस्टरमुळे 1000 पेक्षा जास्त रोजगारांना व नवीन रोजगारनिर्मितीला चालना मिळत असल्याने ही योजना ग्रामीण व शहरी उद्योगांसाठी महाराष्ट्र शासनाची अत्यंत प्रभावी आणि महत्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र, कोरोना महामारीचा नुकतीच उभारी घेणार्‍या क्लस्टरांना मोठा फटका बसला आहे, उद्योग व उद्योजक अडचणीत आले आहेत, असे सांगून ते म्हणाले, या पार्श्‍वभूमीवर महा औद्योगिक क्लस्टर असोसिएशनच्या पुढाकाराने केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेवून त्यांच्यासमोर समस्या मांडल्या. यावेळी झालेल्या चर्चेत सचिव गोरे यांच्यासह गणेश सुपेकर,गोपाल चंदन, देवकर यांनी सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजना (एमएसआय-सीडीपी) या योजनेतील क्लस्टरांना सूक्ष्म व लघु उपक्रम औद्योगिक समूह विकास कार्यक्रम (एमएसआय-सीडीपी) या योजनेचा लाभ  मिळावा तसेच केंद्र शासनाच्या विविध क्लस्टर योजनेचा लाभ, जी.एस.टी. परतावा, राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाच्या कच्चा माल सहाय्य योजना तसेच  कच्च्या मालाची बैंक निर्मितीसाठी क्लस्टरच्या क्षमता व मागणीच्या मर्यादेनुसार 100 कोटीपर्यंत शासन हमीसह विनातारण कर्ज, कौशल्य विकास योजनेचा लाभ, सौर यंत्रणा  तसेच शासकीय खरेदीत प्राधान्य मिळावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. उद्योजकांच्या या अडचणीं सोडवण्यासाठी गडकरी यांनी सकारात्मकता दाखवली व लवकरच याबाबत निर्णय घेतले जातील, असे सांगितले. तसेच तातडीने संबंधित अधिकार्‍यांना तसे निर्देश दिले. केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही दिली. यावेळी केंद्र शासनाच्या एमएसएमई विभागाचे संचालक पी. एम. पार्लेवार व सुर्ती योजनेचे शर्मा उपस्थित होते.

उद्योजकांना नवसंजीवनी मिळेल

औद्योगिक क्लस्टरमुळे रोजगाराला चालना मिळणार असल्याने तसेच केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या आवश्क मदत करण्याबाबतच्या विकासात्मक निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशातील नव उद्योजकांना नवसंजीवनी मिळून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करण्याची संधी मिळणार असल्याचा विश्‍वास क्लस्टर संघटनेचे अध्यक्ष लोळगे यांनी व्यक्त केला.

COMMENTS