ऑरगॅनिक केमिकल कंपनीस आग… गुप्ततेमुळे संशय बळावला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑरगॅनिक केमिकल कंपनीस आग… गुप्ततेमुळे संशय बळावला

नेवासा फाटा (प्रतिनिधी) तीन चार दिवसांपूर्वी आग लागली त्यामध्ये काही प्रमाणात कंपनी चे नुकसान झाले या आगीने रौद्ररूप धारण केल्या नंतर अग्नीशमन बंब

नवीन विद्युत उपकेंद्र व ट्रान्सफॉर्मर उभारून विजेच्या समस्या प्राधान्याने सोडवा
मानवी तस्करीत अडकलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी वकिलांची भूमिका महत्वाची l LokNews24
नॅशनल पिनॅकल अवार्डने संतोष यादव यांचा गौरव

नेवासा फाटा (प्रतिनिधी)

तीन चार दिवसांपूर्वी आग लागली त्यामध्ये काही प्रमाणात कंपनी चे नुकसान झाले या आगीने रौद्ररूप धारण केल्या नंतर अग्नीशमन बंब पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. सदर आगी बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. या बाबत पोलीस यंत्रणेला कोणतीही खबर देण्यात आली नाही.कंपनीतुन होत असलेल्या अवैध धंद्याची खबर पोलीसाना लागल्याच्या संशय आल्याने मुद्देमाल नस्ट करत असताना ही आग लागल्याची उलट सुलट चर्चा परिसरात होत आहे.

या आगीमध्ये सुदैवाने काहीही जीवित हानी झाली नाही. आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन बंब बोलवण्यात आला होता परंतु आग वेळीच आटोक्यात आली.या आगी संदर्भात नागरिकांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या ठिकाणी खुलेआम अवैध मद्यार्क तस्करी चालू असल्याची चर्चा आहे?.गेल्या वर्षी उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने या कंपनीवर छापा टाकून सुमारे ४०हजार ५३५ लिटर मद्यार्क जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे २० लाख रुपये होती .तर ते वाहतूक करण्यासाठी वापरात असलेले दोन टँकर ,एक चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले होते.

त्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात येऊन या कंपनीचे मालक यांना अटक करण्यात आली होती . त्याच पद्धतीने पुन्हा चोरी छुपके अवैधरित्या मद्यार्क तस्करी चालू असल्याची चर्चा असून सदर प्रकारची माहिती पोलिस यंत्रणेला लागल्याची शंका आल्याने मुद्देमाल नस्ट करण्यासाठी ही आग लावण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.या वेळी ही आग इतरत्र पसरून कंपनीला नुकसान झालेचे दिसत आहे. परंतु आगी बाबत चौकशी झाल्यास अवैध धंद्याचा सुगावा लागू नये म्हणून जाणूनबुजून कंपनीचा काही भाग जाळळ्याची परिसरातील नागरिकांत चर्चा आहे.

या धंद्यामध्ये एक मोठी राज्यस्तरीय टोळीच कार्यरत असून या टोळीच्या यंत्रणेतील लोकांचा येथे मोट्या प्रमानात नेहमी वावर असतो . या ठिकाणी होणाऱ्या अवैध धंद्यास नेमका कोणाचा आशीर्वाद आहे त्यात कोण सामील आहे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे.यातून मोठी राज्यस्तरीय टोळीच उघड होण्याची शक्यता आहे.

COMMENTS