ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी सोळा अधिकार्‍यांची फौज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी सोळा अधिकार्‍यांची फौज

शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

पुण्यात पोलिसाची चौकीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या
कुदळे दाम्पत्यास शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे जीवनगौरव पुरस्कार
क्रीडा स्पर्धेतील गुणवंत खेळाडूंचा गुणगौरव

पुणे/प्रतिनिधी: शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे व त्यांना लागणार्‍या ऑक्सिजन व रेमडेसिविर व अन्य औषधांची मागणीदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

 सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, अनेक हॉस्पिटलला तीन-चार दिवस ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली, तरी ऑक्सिजन सिलेंडर रिफीलींग सेंटरवर उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढून ऑक्सिजन सिलेंडर रिफिलींग सेंटरवर लक्ष ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल 16  वरिष्ठ अधिकार्‍यांची फौज नियुक्त केली आहे. 

जिल्हाधिकारी देशमुख यांनी आपल्या आदेशात पुणे जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठया प्रमाणात वाढ होत आहे, असे निदर्शनास आणले आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातील कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, जम्बो कोविड हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटल कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिलेंडर्स त्याचप्रमाणे सक्षम  यंत्रणा व पाईपलाईन करण्यात आलेली आहे. कोरोना रुग्णांवर वैद्यकीय उपचारादरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली, तरी केवळ ऑक्सिजन सिलेंडर रिफिलींग सेंटरवर उशीर होत असल्याने हॉस्पिटलला वेळेवर ऑक्सिजन पुरवठा होत नाही. याच साठी जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडर रिफिलींग पुरवठा करणार्‍या 16 वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 16 अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS