एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण मिळावे यासाठी राज्यात आंदोलनाला प्रारंभ

नगर- १ नोव्हेंबर  पासूनएसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण देऊन 50% चे आतील आरक्षण मर्यादेत बसवावे  यासाठी आंदोलनला प्रारंभ करण्यात आला

अत्याचार करणार्‍यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य अंगीकारा
अष्टशताब्दी वर्षनिमित्त कोपरगाव तालुक्यातील रस्ता करावा
नगर अर्बन बँकेचे निवडणूक रिंगण लागले फुलू…; इच्छुकांनी साधला गुरुपुष्यांमृत योग, 48 अर्ज दाखल

नगर-

१ नोव्हेंबर  पासूनएसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण देऊन 50% चे आतील आरक्षण मर्यादेत बसवावे  यासाठी आंदोलनला प्रारंभ करण्यात आला आहे आरक्षण बचाव मोहीमेत सहभाग नोंदवूयात आणी मिळालेले आरक्षण अबाधित ठेवूयात.असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे 

                           आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातूनआरक्षण अबाधित ठेउयात यासाठी निवेदन देण्यात आले नगरमध्ये नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी अ, नगर  एसबीसी संघर्ष समितीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष  कल्याण कांबळे,विभागीय अध्यक्ष  ज्ञानेश्वर फासे,महाराष्ट्र राज्य समितीचे (मॉंडरेटर)  सोमनाथ खाडे,उपजिल्हाध्यक्ष  प्रकाश मारवाडे, सचिव  अरुण दळवी, संजय मते, पांडुरंग डफळ, अविनाश झिकरे,सुनील पावले आदी सह कार्यक्रते हजर होते

                         श्री खाडे यावेळी बोलताना म्हणाले आरक्षण रद्द झाले तर  एसबीसी प्रवर्ग  समाजाची फार मोठी हानी होण्याची दाट शक्यता  आहे. आपणास याची कल्पना आहे की, शासनाने दिलेले  एसबीसी आरक्षण विरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे.हे अवैधरित्या ‌दिले गेले आहे.ते रद्द करावे.असे दाखल करणाऱ्यांचे म्हणणे आहे. तरी आपणास मिळालेले आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक एसबीसी प्रवर्गातील नागरिकांनी आत्ताच हातपाय हलविणे गरजेचे आहे. यास्तव आपल्या अमूल्य वेळेतून थोडा वेळ समाजासाठी देउयात व आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले 

                         मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य/मा.उपमुख्यमंत्री/मा.वि.मा.प्र.मंत्री यांना लिहीलेले निवेदन, माननिय तहसीलदारसो अहमदनगर यांचेकडे एसबीसी.संघर्ष समिती,अहमदनगर यांनी सादर केले आहे. एसबीसी प्रवर्गाला स्वतंत्र 2% आरक्षण देऊन 50% चे आतील आरक्षण मर्यादेत बसवावे यासाठी निवेदन देण्यात आले. 

                         एसबीसी  आरक्षण बचाव आंदोलनाचा रोज पुढील प्रमाणे कार्यक्रम आहे  दि.1 –सर्व तहसीलदार निवेदन देण्यात आले,दि.3नोव्हेंबर –सर्व जिल्हाधिकारी निवेदन,दि.5 नोव्हेंबर-सर्व आमदार/खासदार याना निवेदन  दि.7 नोव्हेंबर- इमेल पाठवणे-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,ओबीसी  मंत्री यांना प्रत्येक घरातून किमान 100 वेळा-सर्व मोबाईल वरून,दि.8 नोव्हेंबर-मेसेज पाठवणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,ओ बी सी  मंत्री किमान 100 वेळ प्रत्येक घरातून-सर्व मोबाईल वरून ,दि.10 नोव्हेंबर-सर्व तलाठ्याद्वारे निवेदन  देण्यात येणार आहे 

                      आरक्षण हि प्रत्येकाची जबाबदारी आहे,आता जर टाळाटाळ केली तर आपण आरक्षणास मुकणार व विनासायास मिळालेलं आरक्षण गमावणार आणि समाजकंठक ठरणार,निर्णय तुमचा,सर्वांनी तुमचं नियोजन नुसार ठरवा  तहसीलदार कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय,आमदार,

तलाठी कार्यालयात   ठरलेल्या तारखेला जमावे व निवेदन द्यावे व एकीची वज्रमुठ सरकारला दाखवावी ,जाती पोटजाती भेद विसरा -कोणाचीच संख्या ५ लाख ही होत नाही,पण  एसबीसी   म्हणून मोठी ताकत दिसते,त्यामुळे खोटं अवसान टाळा, समाज मोठा,व्यक्ती नाही म्हणून  एसबीसी  आरक्षणबचाव लढ्यात सामील व्हा असे आवाहन -शशिकांत आमणे,प्रदेशाध्यक्ष  एसबीसी   संघर्ष समिती महाराष्ट्र यांनी केले आहे 

COMMENTS