एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळणार ? राज्य सरकारचा जीआर केला अमान्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांचा संप चिघळणार ? राज्य सरकारचा जीआर केला अमान्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून, सोमवारी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठी

पवार विरुद्ध पवार संघर्ष शिगेला
आत्ताच एल निनोच्या परिणामांचा अंदाज वर्तवणे अयोग्य हवामान तज्ज्ञांचे मत
आईवडिलांची शेवटच्या श्‍वासापर्यंत सेवा करा ः हभप साधनाताई मुळे

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला असून, सोमवारी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, हा जीआर अमान्य असल्याचे सांगत एसटी कर्मचार्‍यांनी आपण संपावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. संपाच्या 11 व्या दिवशीही तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचार्‍यांचा संप अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यासाठी गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. सोमवारी कोर्टात संपाबाबतची सुनावणी झाली. त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधत कोर्टातील कार्यवाहीची माहिती दिली. 36 एसटी कर्मचार्‍यांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आम्ही दुखवटा पाळत असून त्यासाठीच संप पुकारला आहे. हा संप फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या दुखवट्याला पोलिसी बळावर हात लावण्याचा प्रयत्न करू नका, असे सदावर्ते म्हणाले.
राज्यात एसटी महामंडळाच्या 250 पैकी केवळ 25 आगारातूनच बससेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे चंद्रपुरात एका एसटी कर्मचार्‍याने विष घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे चंद्रपूर शहरातील प्रमुख आगारामध्ये वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या सत्यजित ठाकूर या कर्मचार्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेला सत्यजित ठाकूर हा 34 वर्षांचा होता. सत्यजित यांची पत्नी आपल्या चार महिन्यांच्या मुलीसोबत नागपूर येथे राहते. दोनच दिवसांपूर्वी ते ब्रह्मपुरीला आले होते.
दरम्यान, कर्मचारी संघटनेच्या कृती समितीच्या वतीने सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात एसटी कर्मचार्‍यांनी संपात सहभाग नोंदवल्यामुळे केवळ 25 आगरातून तुरळक प्रमाणात एसटीची सेवा सुरू होती. मात्र एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाश्यांचे मोठे हाल झाले आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर कामावर परतणार्‍या चाकरमान्यानाही त्याचा फटका बसला आहे.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद व परभणी या जिल्ह्यातील बससेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मुंबई प्रदेशातील सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे येथील एसटी वाहतूक बंद असून मुंबई, पालघर, रत्नागिरी येथील वाहतूक कमी प्रमाणात सुरु आहे. गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर व वर्धा जिल्ह्यातील बससेवा थांबविण्यात आली आहे. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच नगर, जळगाव, अकोला, अमरावती, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यातील एसटी गाड्या जागेवरच थांबविण्यात आल्या आहेत.
एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने एकट्या पुण्यातील स्वारगेट डेपोतून जाणारी 200 एसट्यांच्या फेर्‍या रद्द झाल्या आहेत. या डेपोमधून जवळपास 136 चालक आणि 128 वाहक संपात सहभागी झाले आहेत. मात्र एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामध्ये आगार प्रशासन सहभागी नसल्याची माहिती आगार प्रमुखांनी दिली आहे. मात्र जो पर्यंत कर्मचार्‍यांचा हिताचा निर्णय होता नाही. आमच्या मागण्या मान्य होता नाहीत तोपर्यंत एकही एसटी डेपोच्या बाहेरा पडणार नसल्याची भूमिका आंदोलनात सहाभागी झालेल्या कर्मचार्‍यांनी घेतली आहे. नाशिक विभागातील सर्वच्या सर्व 13 डेपोतील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिकमधील एन.डी. रोडवरील आगार क्रमांक 1 मधील कर्मचार्‍यांनी काल दुपारपासून अचानक कामकाज बंद करून संघर्ष युनियनची स्थापना केली आणि ते आंदोलनात सहभागी झाले. या युनियनचे अनेक सभासद प्रत्येक डेपोत आहे. त्यामुळे नाशिक जिल्हात या आंदोलनाला धार येणार आहे. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपानुसार येवला आगारातील कर्मचारीही मध्यरात्रीपासून संपात सहभागी झाले. यामुळे येवला आगारातून सुटणारी बस वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सुट्टीत आपल्या घरी आलेल्या प्रवाशांचे नोकरीच्या ठिकाणी जाताना प्रचंड हाल सुरू आहेत.


दिवाळीनिमित्त गावी आलेल्या प्रवाशांचे हाल
ऐन दिवाळीनिमित्त असलेल्या सुटयामुळे अनेकांनी आपले गाव जवळ केले. यामध्ये माहेरी आलेल्या महिला, तरुणी, नोकरदार यांना आता परत जाण्यासाठी खासगी वाहनाचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. एसटी आंदोलनामुळे राज्यभरातल्या प्रवासांची गैरसोय सुरू आहे. अनेक चाकरमानी दीपावली सुट्टीसाठी कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यांना नोकरीच्या ठिकाणावर परतता येत नाही. त्यामुळे ते ठिकठिकाणच्या एसटी आगारावरच अडकून पडले आहेत. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सार्‍यांची फरपट सुरू आहे.


चक्क हातात बांगड्या भरून एसटी चालक कामावर हजर
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे हे सोमवारी चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले. चालक अशोक वनवे हे मुळचे बीड येथील असून ते नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहे. ते म्हणाले की,आपल्या पत्नीने कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा असे सांगितले. तसेच कामावर न आल्यास मेमो मिळेल ही भीती होती. त्यामुळे हातात बांगडया भरून कामावर हजर झाल्याचे त्यांनी सांगितले. आमचे एसटीचे कर्मचारी आत्महत्या करत आहेत त्यामुळे यंदा आमच्या कुटुंबाने दिवाळी साजरी केली नसल्याचे ते म्हणाले.

COMMENTS