एसटीच्या संपाने प्रवाशांची लुटालूट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीच्या संपाने प्रवाशांची लुटालूट

अहमदनगर/प्रतिनिधी : एसटीच्या संपामुळे नगर शहर व जिल्ह्यातील प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूक करणारांकडून अक्षरशः लुटालूट सुरू आहे. पुणे वा औरंगाबादला

वाकडी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन मागे
आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही : अण्णा हजारे
पाकिस्तानचे वादळ नगरपर्यंत पोहोचले ?

अहमदनगर/प्रतिनिधी : एसटीच्या संपामुळे नगर शहर व जिल्ह्यातील प्रवाशांची खासगी प्रवासी वाहतूक करणारांकडून अक्षरशः लुटालूट सुरू आहे. पुणे वा औरंगाबादला जाण्यासाठी एसटीचे भाडे सुमारे दोनशे रुपयांपर्यंत आहे. पण एसटी बंद असल्याने खासगी ट्रॅव्हल्स वा अन्य गाडीचालकांकडून प्रत्येकी 500 रुपये घेतले जात आहेत. या लुटालूटीने प्रवासी वैतागले आहेत. जिल्हा प्रशासनाचे या लूटमारीकडे दुर्लक्ष होत आहे.
शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी एसटीच्या चालक-वाहकांसह अन्य कर्मचार्‍यांनी संप सुरू केला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील सर्व आगार जवळपास बंद आहेत. शहरातील माळीवाडा, पुणे व तारकपूर या तिन्ही बसस्थानकांवर एसटी बसची वाट पाहण्यात प्रवाशांचा वैताग वाढत आहे. दीपावली सणानिमित्त असलेल्या सुट्ट्यांमुळे पुण्या-मुंबईत नोकरी करणारे तसेच भाऊबीजेनिमित्त नगरला भावाच्या घरी आलेल्या महिलांना पुन्हा आपल्या घरी जाण्यास एसटी मिळत नसल्याने त्यांचा संताप होत आहे. पुण्या-मुंबईतील नोकरदारांना नोकरीवर वेळेत पोहण्याची गरज असल्याने अडला हरी…प्रमाणे 500 ते 1000 रुपये देऊन खासगी गाड्यांतून पुणे वा मुंबईला जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राज्यातील निम्याच्यावर एसटी डेपोतील कामकाज ठप्प झाले आहेत. वाहक-चालक आगार परिसरात धरणे-ठिय्या देत असून लालपरीचे चाक जागेवरच थांबल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. नगरच्या तिन्ही एसटी स्टॅन्डवर प्रवाशाची मोठी गर्दी असून ज्या आगारातील तुरळक बस येत आहेत, त्यात जागा मिळावी, किमान उभे राहून प्रवास करता यावा यासाठी प्रवासी रेटारेटी करत आहेत. यात महिला,मुले, वयोवृद्ध प्रवाशांचे हाल होत आहेत. अहमदनगरचा मुख्य तारकपूर आगारासह जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, कर्जत, जामखेड आदी सात आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी आहेत. त्याचा परिणाम कामबंद असलेल्या शहरातील प्रवाशांना याची मोठी झळ बसत आहे. एसटी बसच्या कामबंद आंदोलनाचा गैरफायदा खाजगी ट्रॅव्हल्स, खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची मोठी आर्थिक लूट करून केला जात आहे. नगरच्या ’पुणे स्थानका’बाहेर पुण्याला जाण्यासाठी प्रवाशामागे तब्बल पाचशे रुपये घेतले जात होते. औरंगाबाद कडे जाणार्‍या प्रवाशांकडूनही पाचशे रुपये मागितले जात होते. दिवाळीची रजा-सुट्टी संपल्याने नोकरी-कामावर हजर होणे गरजेचे असल्याने अनेक प्रवासी बस स्टॅन्ड बाहेर उभ्या राहणार्‍या ट्रॅव्हल्स, खाजगी वाहने यातून जास्त पैसे मोजतानाचे चित्र आहे.

COMMENTS