`एमपीएससी’कडूनच राबवा   आरोग्य विभागाची भरती प्रकिया : आ. निरंजन डावखरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

`एमपीएससी’कडूनच राबवा आरोग्य विभागाची भरती प्रकिया : आ. निरंजन डावखरे

सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदाची सरळ सेवेने होणारी भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाऐवजी `एमपीएससी'कडूनच राबवावी, अशी मागणी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

गुढीपाडव्यादरम्यान मंदिरात भक्तांसमोर पुजाऱ्याचा खून
मुंबई पोलिस भरतीची 23 जुलै रोजी लेखी परीक्षा
कवाद पतसंस्थेकडून स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवारांचा गौरव

ठाणे : सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गातील ८९९ पदाची सरळ सेवेने होणारी भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाऐवजी `एमपीएससी’कडूनच राबवावी, अशी मागणी भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. 

एमपीएससी’ला डावलून स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरतीचा निर्णय चुकीचा आहे, असे आमदार डावखरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. एमपीएससी ही राज्यातील वर्ग १ व वर्ग २ या पदांची भरती प्रक्रिया राबविणारी घटनात्मक संस्था आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग १ च्या पदाची भरती प्रक्रिया स्वतंत्र निवड मंडळाकडून करणे हे असंवैधानिक आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वर्ग १ या पदाचीही भरती होणार असल्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यामुळेच या दोन्ही पदांची भरती `एमपीएससी’कडून करावी, असे आमदार डावखरे यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ पदभरती आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वीचा आरोग्य विभागाच्या परीक्षांचा घोळ लक्षात घेता वर्ग १ या महत्वाच्या पदांसाठी पुन्हा स्वतंत्र निवड मंडळ नेमून पुन्हा घोळ घालायचा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS