Homeमहाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांनी एटापल्लीतील हेडरी येथे साजरा केला रक्षाबंधनाचा सण

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस द

स्वतःच्याच गॅरेजमध्ये गळफास घेऊन गॅरेज चालकाची आत्महत्या
अल अमीन उर्दू हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
परिवहनमंत्री अनिल परब यांना सीबीआयचे समन्स ?

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नक्षली कारवायांचे केंद्र असलेल्या अतिसंवेदनशील एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथील पोलीस आउटपोस्टला भेट देऊन पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस, पोलीस कुटूंबातील महिला आणि स्थानिक आदिवासी महिलांकडून राखी बांधून घेत रक्षाबंधनाचा सण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. याप्रसंगी उपस्थित सर्व महिला भगिनींना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यासमयी नक्षली कारवायांचा धोका पत्करून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधव आणि भगिनींना ते करत असलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले तसेच त्यांना कर्तव्य बजावताना येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि सर्व पोलीस बांधव त्यांचे कुटूंबीय आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.

COMMENTS