एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : एएनएम (ऑक्सिलारी  नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक

शिवसेनेशी युतीची शक्यता आता मावळली- मुनगंटीवार
दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा : मुख्यमंत्री
Shrigonda :जाहिरातबाजीवर १६० कोटींची खैरात, कर्जबाजारी शेतकरी वाऱ्यावर…पाचपुतेंची ठाकरे सरकारवर टीकाI LOK News 24
मुंबई : एएनएम (ऑक्सिलारी  नर्सिंग मिडवाइफरी तथा सहायक नर्सिंग मिडवाइफरी) आणि जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवाइफरी) या अभ्यासक्रमांसाठी यंदा सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेण्यात येणार नसल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली.
 महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसचिव दौलत देसाई, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर,वैद्यकीय शिक्षणसहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी आणि मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, यापूर्वी एएनएम आणि जीएनएमच्या प्रवेशप्रक्रिया या सीईटीच्या गुणांवर आधारित करण्यात येत होत्या. मात्र या वर्षापासून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया ही बारावीच्या गुणांवर आधारित असेल.कोविड सारख्या महामारीच्या काळात देशासह राज्याला वैद्यकीय डॉक्टर यांच्याबरोबरच नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व दिसून आले आहे. येणाऱ्या काळात शासकीय आणि खाजगी रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना किमान समान वेतन मिळत आहे का याबाबतची पाहणीही महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने करणे गरजेचे असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री. देशमुख म्हणाले की, आज किती रुग्णांमागे एक डॉक्टर असावा हे जसे निश्चित करण्यात आले आहे तसेच किती रुग्णांसाठी परिचारिका असाव्यात हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे. डॉक्टरांबरोबरच परिचारिकाद्धा रुग्ण बरा होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने किती रुग्णांमागे परिचारिका असाव्यात याचा अभ्यास मंडळाने करणे गरजेचे आहे. इतर राज्यात नेमकी याबाबत काय परिस्थिती आहे याबाबतचा अभ्यास करुन याबाबतचा अहवाल तयार करावा अशा सूचनाही श्री.देशमुख यांनी यावेळी केल्या.

COMMENTS