उरमोडी धरणग्रस्तांना जीवे मारण्याची धमकी

Homeमहाराष्ट्रसातारा

उरमोडी धरणग्रस्तांना जीवे मारण्याची धमकी

पळशी (ता. माण) येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात जमीन क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पातील धरणग्रस्त दीपक शंकर देवरे (कातवडी बु. पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी केला.

स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे नाशिक दौऱ्यावर – करण गायकर  
गौतम पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी
रावसाहेब खेवरे यांची अ‍ॅड लांडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

न्याय न मिळाल्यास 29 रोजी आत्मदहनाचा इशारा

सातारा : पळशी (ता. माण) येथील पर्यायी जमिनीच्या बदली प्रस्तावासंदर्भात जमीन क्षेत्राचे अनाधिकाराने परस्पर वाटप केल्याचा आरोप उरमोडी प्रकल्पातील धरणग्रस्त दीपक शंकर देवरे (कातवडी बु. पो. नित्रळ, ता. सातारा) यांनी केला. त्यांना मिळालेल्या पर्यायी जमिनीचे वाटप योग्य पध्दतीने न झाल्यास 29 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहनाचा इशारा देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

देवरे म्हणाले, सुमारे साडेचार एकर जमीन 1997 च्या उरमोडी धरण क्षेत्रात गेली होती. त्याला पर्यायी जमिनी पळशी येथे देण्याचा शासन निर्णय झाला होता. 1792 गटातील एक हेक्टर व वीस आर क्षेत्राचे वाटप झाले. मात्र, संकलन पत्रात 2 हेक्टर 26 आर क्षेत्राचे वाटप असताना गट क्रं. 40 मधील केवळ 1 हेक्टर आर क्षेत्राची नजरचुकीने नोंद झाली. त्यामुळे सुमारे एक हेक्टर क्षेत्र कमी मिळाले आहे. संकलन पत्राच्या दुरुस्तीसाठी सतत तीन वर्ष संघर्ष केल्यावर संकलन पत्र दुरुस्त झाले.

प्राप्त जमिनीच्या वाटपासाठी प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज केला असताना जमीन शिल्लक नसल्याचे कारण देण्यात आले. पुन्हा महसूल विभागात संघर्ष करून 40 आर जमिनीचा आदेश मिळवून पळशी येथे जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले असता अनोळखी 35 ते 40 व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली. त्या वेळी म्हसवड पोलिसांचे संरक्षण घेण्याची वेळ आली. तलाठी, मंडलाधिकारी, सर्व्हेअर यांनी त्या जमिनीची नोंद दुसर्‍या व्यक्तींच्या नावे पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात केली असल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास 29 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. 

COMMENTS