Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बहिणी ’जरंडेश्‍वर’मध्ये भागीदार : किरीट सोमय्या

सोलापूर : किरीट सोमय्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र

10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत
उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी मनेष गाडे

सोलापूर : किरीट सोमय्या सोलापूर दौर्‍यावर आहेत. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन पवार कुटुंबियांवर मोठे आरोप केले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी जरंडेश्‍वर कारखान्यात भागीदार आहेत आणि याबाबतचे पुरावे मी ईडीला पाठवणार आहे, असा छातीठोक दावा त्यांनी केला आहे. याच पत्रकार परिषदेत त्यांनी खा. शरद पवार, ना. अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांना हा दावा खोटा पाडण्याचे खुले आव्हान दिले आहे.
किरीट सोमय्या म्हणाले की, अजित पवार, शरद पवार म्हणत आहेत की, माझ्या बहिणींचा काहीही संबंध नसताना ईडी चौकशी करत आहे. मात्र, अजित पवार यांच्या बहिणी आणि त्यांचे मेहुणे जरंडेश्‍वर कारखान्यात पार्टनर आहेत. त्यामुळे तुम्ही कुणाशी बेईमानी करत आहात? ही बेईमानी बहिणीशी की महाराष्ट्रातील जनतेशी? असा सवाल त्यांनी केला आहे.
सोमय्या यांनी पवार कुटुंबियांना आव्हान देत म्हटलंय की, माझे शरद पवार यांना चॅलेंज आहे की हे चोपडे मी उद्या ईडी आणि इनकम टॅक्सला पाठवणार आहे. सहकार न्यायालयाला ही पाठवणार आहे. यातला एकही कागद खोटा असेल पवार कुटुंबियांनी मला सिध्द करुन दाखवावे.

COMMENTS