उद्यानाची मोडतोड करणे योग्य नाही- नगराध्यक्ष वाहडणे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

उद्यानाची मोडतोड करणे योग्य नाही- नगराध्यक्ष वाहडणे

कोपरगाव शहरात स्वतंत्रवीर  सावरकर उद्यान धारणगाव रोड याची काही अज्ञात लोकांनी नासधूस करत तेथील बसण्यासाठी असलेले बाके, कंपाउंड किंवा इतर साहित्याची नासधूस केली असून हे कृत अयोग्य असून लोकांना शासन होण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत न दिल्यास आंदोलन छेडणार
विद्यार्थ्यांना थेट शाळेतच एसटी पासचे वाटप
आईवडिलांची शेवटच्या श्‍वासापर्यंत सेवा करा ः हभप साधनाताई मुळे

कोपरगाव शहर प्रतिनीधी- कोपरगाव शहरात स्वतंत्रवीर  सावरकर उद्यान धारणगाव रोड याची काही अज्ञात लोकांनी नासधूस करत तेथील बसण्यासाठी असलेले बाके, कंपाउंड किंवा इतर साहित्याची नासधूस केली असून हे कृत अयोग्य असून लोकांना शासन होण्याची गरज असल्याचे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.    या वेळी वहाडणे यांनी सांगितले की,  तीन  वर्षांपूर्वी स्वा.सावरकर उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्या बसण्यासाठी बाके बसविण्यात आली.  दररोज सायंकाळी या उद्यानात लहान मुलामुलींची खेळण्यासाठी गर्दी होत असे लहानसोबत महिलांनाही देखील या  उद्यानाचा लाभ होत आहे पण दुर्दैवाने या उद्यानातील बाके-खेळण्या-कंपाउंडची काही विघ्नसंतोषी लोकांनी मोडतोड केली आहे.  कदाचित उद्यानाचे नांव “स्वा.सावरकर उद्यान” असल्यानेही काहींची पोटदुखी असावी असे वहाडणे यांनी सांगितले तसेच येणाऱ्या दिवसात उद्यानाची  दुरुस्ती करून अजून झाडे लावून पुन्हा उद्यान सुरू केले जाईल परंतु नागरिकांनी सार्वजनिक सोयी सुविधांचा वापर योग्य रीतीनेच करावा आपल्या कर रूपाने दिलेल्या पैशातूनच ही कामे होत असतात त्यामुळे याचा योग्य वापर होणे गरजेचे असून त्यासोबतच अशा चुकीच्या प्रवृत्तीना जाब विचारायची धमकही नागरिकांनी दाखविली तर शहराचे हितच होईल असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.

COMMENTS