उद्धव ठाकरे म्हणजे साधाभोळा माणूस… बाळासाहेबांचे तेच खरे वारसदार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणजे साधाभोळा माणूस… बाळासाहेबांचे तेच खरे वारसदार…

प्रतिनिधी : मुंबईऔरंगाबाद येथील एका भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तुती रेशीम उद्योग-एक शेती पूरक उद्योग
महाआयएसजीकॉन २०२३’ नाशिकचे शनिवारपासून आयोजन
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !

प्रतिनिधी : मुंबई
औरंगाबाद येथील एका भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप -शिवसेना युतीच्या चर्चा रंगल्या.

यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्द्यांवर भाष्य केले.

राज्यात शिवसेना -भाजपचे सरकार यावे अशी प्रत्येकाची इच्छा होती . याकरता दोन्ही पक्षांमध्ये अडीज-अडीज वर्षांचा वाटा ठरला होता. मात्र एकमत न झाल्याने तसे घडले नाही .

शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत येत सत्ता स्थापन केली . उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत. मित्र म्हणून अत्यंत साधाभोळा माणूस आहे, अशा शब्दात रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले .

यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कवितेच्या स्वरूपात मोलाचा सल्लाही दिला .

उद्धव ठाकरे यांनी महायुतीत यावे, आणि फडणवीसांचे गीत गावे. फडणवीसांनी एक दिवस मातोश्रीवर जावे, आणि उद्धवजींना घेऊन यावे, अशी कविता केली. गो कोरोनासारखी माझी हाक ‘कम उद्धवजी’ अशी असेल, असेही त्यांनी सांगितले.

तसेच देवेंद्र फडणवीसांना सल्ला देताना उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घ्यावे, अडीज वर्षे त्यांना द्यावे, अडीज आपण घ्यावे, असेही आठवले म्हणाले . तसेच शरद पवारांवर कविता करत त्यांना एनडीएत येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .

आठवले म्हणाले की, शरद पवार आहेत माझे चांगले मित्र, समतेचे आहे त्यांच्यात चित्र. गोविंदरावांचे आहेत ते पूत्र, पवारांना मी देतो शुभेच्छा, त्यांनी एनडीएत यावे ही इच्छा, अशी मागणी कवितेद्वारे केली.

आठवले यांनी राजकारणापलीकडे जाऊन काही खाजगी गोष्टींवरही चर्चा केली . जेव्हा माझ्या सोबत आली माझी बायको सीमा, तेव्हा मी लागलो होतो माझ्या कामा…अशी शीघ्र कविता देखील त्यांनी केली.

ज्या समाजासाठी मी लढलो, त्याच आपल्या लोकांनी माझ्यावर ठिकठिकाणी हल्ले केले . याचे मला दुःख असल्याचेही आठवले म्हणाले .

COMMENTS