उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत- पंतप्रधान

Homeताज्या बातम्यादेश

उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत- पंतप्रधान

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश समर्थ प्रदेश बनू शकतो, असा आत्मविश्वास गेल्या काही वर्षात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोण बदलल

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची धुरा भारताच्या हाती
महागाईबद्दल मोदींनी जनतेची माफी मागावी : थोरात
..या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उसाचे बिल झाले जमा ! LokNews2

वी दिल्ली : उत्तरप्रदेश समर्थ प्रदेश बनू शकतो, असा आत्मविश्वास गेल्या काही वर्षात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोण बदलला आहे. तसेच यूपीच्या इतिहासात पहिल्यांदा गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण झालीय. गरीब, कमकुवत लोकांना घाबरवणारे, त्रास देणारे आणि अवैध ताबा घेणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान म्हणाले की, ज्या व्यवस्थेला भाऊ-पुतण्या आणि भ्रष्टाचाराचे व्यसन लागले होते, त्यात आता बदल सुरु झाला आहे. लोकांच्या लाभाचा पैसा त्यांच्या खात्यात पोहोचण्यासाठी पाऊलं उचलली जात आहेत. उत्तर प्रदेश गुंतवणुकीचे केंद्र बनत आहे. जगभरातील कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत. उत्तर प्रदेशचे लोक आत्मनिर्भर भारताचे आधार आहेत. आज आपण स्वातंत्र्यांचे 75 वर्ष पूर्ण होण्याचा उत्सव साजरा करत आहोत. या पुढील 25 वर्षांसाठी मोठे लक्ष्य आणि मोठ्या संकल्प ठेवण्याची संधी आहे. भारताचे तरुण-तरुणी पदके जिंकत आहेत. त्यामुळे जगभरात भारताला सन्मानाचे स्थान मिळत आहे. कुटुंबामुळे नाही तर मेहनतीमुळे प्रगती निश्चित होते हे सिद्ध झालंय. भारतीय युथ मोठी झेप घेत आहे, असंही मोदी म्हणाले. गेले अनेक वर्षे यूपीला केवळ राजकारणाच्या दृष्टीने पाहायलं जायचं. देशातील विकासामध्ये राज्याच्या योगदानानी कोणीही चर्चा करायचे नाही. पण, गेल्या काही वर्षात यूपीच्या विकासाच्या इंजिनला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधानांनी विरोधकांना फैलावर घेताना म्हणाले की, काही लोक संसदेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देशाचा विकास शांबतोय. अशा स्वार्थी राजकारण्यांना देश थारा देणार नाही, असं मोदी म्हणाले. 5 ऑगस्टची इतिहासात नोंद असेल. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आले होते. मागील वर्षी, राम मंदिर निर्माणाची पायभरणी करण्यात आली होती. भव्य अशा राम मंदिराची उभारणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS