Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निरीक्षक लाचलूचपतच्या जाळ्यात

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील वर्ग 2 चे निरीक्षक शहाजी आबा पाटील (वय 56) याला परमिट रुम बिअरबारचा परवाना नूतनीकरणासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज रंगेहात पकडले.

महाविद्यालयीन विद्यार्थिनीमध्ये बॉयफ्रेंड वरून तुफान राडा
कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार
वैशाली टक्कर मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

सांगली जिल्ह्यातील वर्ग 2 चा अधिकारी सापडण्याची दुसरी कारवाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येथील वर्ग 2 चे निरीक्षक शहाजी आबा पाटील (वय 56) याला परमिट रुम बिअरबारचा परवाना नूतनीकरणासाठी 15 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज रंगेहात पकडले. गेल्या चार वर्षांत प्रथमच ही कारवाई झाली आहे. सांगली जिल्ह्यातील वर्ग 2 चा अधिकारी सापडण्याची ही दुसरी कारवाई असून त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. परमिटरूम बिअरबार चालकाने दिलेल्या तक्रारींवरून ही कारवाई झाली. त्या बिअरबार चालकाने त्याच्या परमिटरूम बिअरबारच्या परवाना नूतनीकरण करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या चालकाने सोमवार, दि. 5 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली कार्यालयात याबाबत तक्रार दिली होती. त्याच्या तक्रारीनुसार दि. 5 सोमवारी पडताळणी केली असता त्यामध्ये लोकसेवक शहाजी पाटील याने परमिटरूम बियर बारचा परवान्याचे नूतनीकरण करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. सहा एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी येथील प्रशासकीय इमारतीत असलेल्या उत्पादन शुल्क कार्यालयात सापळा लावला. त्यात शहाजी आबा पाटील यांना लाचेची मागणी करून 15 हजार रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. शहाजी पाटील यांच्याविरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, पोलीस उपअधीक्षक सुजय घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुरुदत्त मोरे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, सलीम मकानदार,  संजय संकपाळ, अजित पाटील, भास्कर भोरे, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सीमा माने यांनी कारवाईत भाग घेतला. 

COMMENTS