इशरत जहाॅ प्रकरणी पोलिस अधिकारी निर्दोष

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इशरत जहाॅ प्रकरणी पोलिस अधिकारी निर्दोष

गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहाँ चकमक प्रकरणी सीबीआय न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

नवरा-बायकोचं एकत्र मद्यपान, नंतर मद्यधुंद पत्नीकडून पतीची हत्या | LOKNews24
बस दरीत कोसळून तीन महिला भाविकांचा मृत्यू
भांडण सोडविणे टपरी चालकाला पडले महाग | LOKNews24

अहमदाबादः गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहाँ चकमक प्रकरणी सीबीआय न्यायालयाने गुन्हे शाखेच्या तीन पोलिस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी अशी त्यांची नावे आहेत. जहाॅ ही लश्कर- ए-तोयबाची दहशतवादी होती. गुप्तचर विभागाचा अहवाल फेटाळता येणार नाही. त्यामुळे तिन्ही अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.  

आयपीएस जी. एल. सिंघल आणि निवृत्त पोलिस उपअधीक्षक तरुण बारोट आणि सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंजू चौधरी यांच्यावर इशरत जहाँ प्रकरणी कारवाई करण्यात गुजरात सरकारने २००४ मध्ये नकार दिला होता. न्यायालयात बुधवारी याच प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. जहाँ ही दहशतवादी होती याचे पुरावे आहेत आणि गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. १५ जून २००४ ला अहमदाबादमध्यो कोतरपूर वॉटर वर्क्सजवळ पोलिस चकमकीत जहाँ, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर हे ठार झाले.  हे सर्व लश्कर- ए- तोयबाचे दहशतवादी होते, असा अहवाल गुप्तचर विभागाने दिला होता. त्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या इराद्याने आले होते, असा आरोप आहे. इशरत जहाँची आई समीमा कौसर आणि जावेद याचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यांनी याचिकेतून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणी एसआयटी नेमली होती. त्यात या पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती.

COMMENTS