इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटर्‍या भारत उत्पादित करणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इलेक्ट्रीक वाहनांच्या बॅटर्‍या भारत उत्पादित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ’अ‍ॅडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेज’च्या नॅशनल प्रोग्रामला मान्यता देण्यात आली आहे.

येवल्यात शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा | LokNews24
गर्लफ्रेंडने 1 लाख मागितल्याने प्रियकराची आत्महत्या
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ’अ‍ॅडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी स्टोरेज’च्या नॅशनल प्रोग्रामला मान्यता देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटर्‍यांची सध्या मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. आता या बॅटर्‍यांचे भारतातच उत्पादन करण्यावर सरकारने भर दिला आहे. 

    या अभियानांतर्गत पर्यावरणास अनुकूल पर्यायांसाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या नेतृत्वाखाली एक ’इंटर-मिनिस्ट्रियल’ समिती गठीत करण्यात आली होती. या अभियानाचे उद्दीष्ट आहे, की मोठ्या प्रमाणात बॅटरी मॉड्यूल आणि पॅक असेंबली प्लांट स्थापित करणे तसेच इंटिग्रेटेड सेल मॅन्युफॅक्चरिंगवरही जोर दिला जाईल. या बॅटरी बनवणार्‍या कंपन्यांना 18 हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहन मिळणार आहे. ही रक्कम पीएलआय योजनेंतर्गत पाच वर्षात कंपन्यांना दिली जाईल. बॅटरीची आयात कमी करण्यासाठी सरकार कठोर पावले उचलू शकते. या कार्यक्रमांतर्गत एकूण 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. परदेशी आणि देशांतर्गत दोन्हींचा यात समावेश करण्यात आला आहे. जावडेकर यांनी सांगितले, की सेल्सच्या आधारावर इन्सेंटिव्हमधील 18 हजार कोटी रुपये दिले जातील. उत्पादन किती ऊर्जा कार्यक्षम आहे, त्यांची गुणवत्ता चांगली आहे का? या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पैसे दिले जातील. एक्साइड, अमरराज या देशातील बॅटरी बनविणार्‍या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच देशांतर्गत स्तरावरील उत्पादनामुळे देशात रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होतील. बॅटरीच्या आयातीवर भारत 20 हजार कोटी रुपये खर्च करतो, असे जावडेकर यांनी सांगितले. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनास चालना मिळेल. देशात बॅटरी तयार झाल्याने मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि चारचाकी वाहने तयार होतील. भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यांवर धावताना दिसतील. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे.

बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहने

देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे; परंतु आता तसे चित्र राहिलेले नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणार्‍या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

COMMENTS