Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आशुतोष लांडगेला केले चिल्लर घोटाळ्यात वर्ग

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी

स्वामी लखनगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
नवनिर्वाचित शिवसेना जिल्हाप्रमुखाला मिरवणुकीत गटबाजीचा राडा l पहा LokNews24
शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेतील 22 कोटीच्या फसवणूक प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या आशुतोष लांडगे याला आता नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्याच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करण्यात आले आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयासमोर हजर केले असता येत्या 30 तारखेपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 नगर अर्बन बँकेचे तत्कालीन संचालक व अधिकार्‍यांवर पिंपरी चिंचवड येथे 22 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये माजी संचालक नवनीत सुरपुरिया तसेच आशुतोष लांडगे व कर्जदार यज्ञेश चव्हाण यांना पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. सुरुवातीला पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये तीन कोटी रुपयांचा चिल्लर घोटाळ्याचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात याअगोदर बँकेचे अधिकारी व कर्मचारी अशा एकूण चार जणांना नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून पोलिस कोठडी घेतली होती. सध्या त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये आशुतोष लांडगेचा समावेश आहे. त्याच्या खात्यातून पाचजणांना रकमा गेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. लांडगेला पिंपरी चिंचवडच्या गुन्ह्यात अटक केली होती. तेथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला नगरच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. तो मंजूर झाल्यावर त्याला नगरच्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आले आहे. हे पैसे त्याने कुणाला व कधी दिले तसेच यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का आणि आर्थिक व्यवहारांमध्ये लांडगेची इतर कागदपत्रेसुद्धा हस्तगत करायची आहेत यासह विविध मुद्दे न्यायालयामध्ये युक्तिवादात मांडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने लांडगेला तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

संचालक अजूनही फरार

नगर अर्बन बँकेच्या संदर्भातले घोटाळ्यांचे विषय आता पुढे येऊ लागलेले असतानाच आता याबाबत दोन गुन्हे दाखल झाले आहे. यात संचालक मंडळावर सुद्धा गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेक संचालक फरार झाले आहेत. आता लांडगेला 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्यात पोलिस कोठडी मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग पुढील तपास कशा पद्धतीने करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS