आरक्षणाच्या पोकळ घोषणा नको, कृती करा; संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणाच्या पोकळ घोषणा नको, कृती करा; संभाजीराजे यांचा राज्य सरकारला इशारा

औरंगाबाद/प्रतिनिधी : मराठा समाजाला आता वेठीस धरू नका. आरक्षण कधीपर्यंत देता ते सांगा. कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक

आ. नितेश राणेंना अटक करा सिटीचौक पोलिसात तक्रार
महिलेच्या पोटात आढळला तब्बल दीड किलोचा गोळा.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दरवर्षीप्रमाणे सोयगाव तालुक्यातील बंजारा समाज बांधवांसोबत केली होळी-रंगपंचमी 

औरंगाबाद/प्रतिनिधी : मराठा समाजाला आता वेठीस धरू नका. आरक्षण कधीपर्यंत देता ते सांगा. कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? त्यासाठी काय करत आहात? कधीपर्यंत आरक्षण देता, हे समाजाला सांगा. आता घोषणा नको, लवकरात लवकर प्रत्यक्ष कृती करा, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना सत्ताधारी व विरोधकांना दिला.
केंद्राने 127 वी घटना दुरुस्ती करून राज्यांना हक्क्क दिले म्हणजे लगेच आरक्षण देता येत नाही. आता पुन्हा मराठा समाजास सामाजिक मागास घटक हे सिद्ध करावे लागेल. तसेच 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षणाचे प्रमाण जात असल्याने अपवादात्मक स्थितीसुद्धा नमूद करावी लागेल. हा कायदेशीर लढा आहे. मात्र, राज्य शासनाने त्यांच्या हातात जे आहे ते तरी करावे, असे आवाहन खासदार संभाजी राजे यांनी औरंगाबाद येथे केले. सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेत 58 मोर्चे कढून सरकारचे लक्ष वेधले होते. पण आजही प्रलंबित मागण्या जैसे थे आहेत, यामुळे मराठा समाज संतप्त झाले आहे. यावर विचार विनमय करून पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या 5 व्या वर्धपान दिनानिमित्त हर्सूल येथील मधुरा लॉन्समध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवरायांच्या जय घोषाने मेळाव्याची सुरुवात झाली होती. मेळाव्यात मराठा समन्वयकांनी सरकार विरोधात रणशिंग फुंकण्याची घोषणा केली. दुजाभावा विरोधात, ओबीसी, मराठा वाद निर्माण करणार्‍यांविरोधात संतप्त प्रतिक्रया उमटल्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी राजे पुढे बोलताना म्हणाले की, 1902 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वंचित बहुजनांना आरक्षण लागू केले होते. पण गोरगरीब मराठा समाजाला यापासून वंचित ठेवण्यात आले. त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी मी 2007 पासून प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र पिंजून काढला आहे. संसदेत सर्वप्रथम मराठा आरक्षणासाठी मीच आवाज उठवला. 127 वी घटना दुरूस्तीवर परखड मत मांडले. उर्वरित खासदार गप्प होते. त्यांनी असे तोंडावर बोट ठेवायला नको. आगरा दौर्‍यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबच्या दरबारात अन्याय विरोधात आवाज उठवला होता. तसेच मराठा समाजावर होणार्‍या अन्याय विरोधात मी संसदेत एकटा बोललो व पुढेही बोलत राहील. तुम्ही कोणत्याही पक्षात असू द्या, समाजासाठी मात्र, एकत्रित येण्याची त्यांनी आवाहन केले.

मराठा समाजाच्या मेळाव्यातील ठराव
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत राज्यातील तीनही पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1 हजार कोटी रुपये निधीची मागणी. कोपर्डीतील नराधमांना तातडीने फाशी द्यावी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवावी. एमपीएससी रिक्त सदस्य पद भरावेत, बार्टीच्या धरर्तीवर सारथीला व अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा, 605 कोर्सेसमध्ये शिष्यवृत्ती मिळावी, आदी ठराव घेण्यात आले.

COMMENTS