आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे

कोपरगांव शहर प्रतिनिधी- कोपरगांव पालिकेची निवडणुक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व  पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या

आमदार आशूतोष काळे यांनी पाच कोटी बाबत दिशाभूल करू नये- उपनगराध्यक्ष कुरेशी
संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे
आमदार काळेंच्या वाढदिवसानिमित्त तळेगांव -मळे येथे वृक्षरोपण.

कोपरगांव शहर प्रतिनिधी-

कोपरगांव पालिकेची निवडणुक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व  पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटूंबियाविरूध्द गरळ ओकत आहे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे कार्यक्षम असुन त्यांनी भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याची जाहिर वाच्यता अहमदनगर येथे केली असे असतांनाही सावळीविहीर कोपरगांव रस्त्यासाठी दीडशे कोटींच्या निधीचे श्रेय प्रसारमाध्यमांवर अश्लाघ्य भाषेत गरळ ओकुन ते घेत असतील तर निंदनीय असुन मतदार संघातील खराब रस्ते, अतिवृष्टींने झालेली पीक नासाडी, स्मार्टसिटीचे पाप, हजारो सुशिक्षीत बेरोजगारांच्या रोजगारावर फिरविलेला वरवंटा आणि समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यावर केलेल्या स्वाक्षरीचे श्रेयही त्यांनीच घ्यावे अशी टिका जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केली. दोन वर्षे आमदार काळेंनी मतदार व त्यांच्या प्रश्नांना वाळीत टाकुन फक्त फोटोनटसम्राट म्हणून वाहवा मिळविली असेही ते म्हणाले. 

            शहरातील भाजपा पक्ष कार्यालयात श्री. विवेक कोल्हे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत आमदार काळे यांच्या चित्रफित आरोपाचा समाचार घेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, सेनेचे गटनेते योगेश बागुल,  कैलास जाधव, भाजपा गटनेते रवि पाठक, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, राजेंद्र सोनवणे, पराग संधान, जितेंद्र रणशुर, निलेश बो-हाडे, अतुल काले, स्वप्नील निखाडे, सत्येन मुंदडा, कालुआप्पा आव्हाड, अशोक लकारे, संदिप देवकर, विनोद राक्षे, गणेश आढाव, बापू पवार, बबलु वाणी, शिवाजी खांडेकर, दिनेश कांबळे, प्रशांत कडु, रविंद्र रोहमारे, विवेक सोनवणे, दिपक जपे, पप्पू पडीयार, रंजन जाधव आदि उपस्थित होते.  शहराध्यक्ष दत्ता काले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

         कोपरगांवचा पाणीप्रश्न आणि समन्यायी पाणी वाटप कायद्याबाबत शिवसेनेचे तत्कालीन नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांनी घेतलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठींबा असुन सर्वांनी एक होवुन हा प्रश्न धसास लावावा असे ते म्हणाले. 

         श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, भाजपाच्या सचिव व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य शासनांच्यामाध्यमांतुन कोपरगांव मतदार संघाच्या विकासाचे प्रत्येक प्रस्ताव मार्गी लावत निधी आणले आहेत म्हणूनच आमदार काळे प्रत्येक ठिकाणी नारळ वाढवून त्याचे श्रेय घेत आहेत. निवडणुक जिंकण्यांसाठी त्यांनी कोपरगांव शहरवासियांना पाचव्या साठवण तळयाचे गाजर दाखविले, निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन पाणी पुरवठा योजनेला न्यायालयाच्या माध्यमांतुन खोडा घातला, शहरातील त्या २८ पैकी ६ कामावर जनतेच्या पैशाची नासाडीहोत होती म्हणून विरोध होता, त्याबाबतही काळे विरोधकांनी शहरवासियांच्या मनात आमच्याविषयी नको ते गैरसमज निर्माण केले. आता यातील वाचलेल्या कोटी निधीचा उपयोग शहर हददवाढीत नव्याने समाविष्ठ झालेल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी करावा. शहरातील आंबेडकर पुतळ्यावर त्यांनी आमने सामने येवून एकदाचा काय तो साक्षमोक्ष करावा, भले सगळ्याच विकास कामांचे श्रेय आमदार काळे यांनीच  घ्यावे पण कोपरगाव शहर व मतदारसंघवासियांचे प्रश्न आणि तातडीच्या गरजा अगोदर सोडवाव्या. 

         वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यातच २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे बारमाही गोदावरी कालवे हक्काच्या पाण्यापासून वंचित झाले आहेत त्याचा परिणाम शहराच्या पिण्यांच्या पाण्यावर होत आहे त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडुन विधीमंडळ कामकाजाच्या माध्यमांतून पाणी आरक्षण घेत निळवडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त ३६० कोटी रूपये खर्चाची पाईपलाईन सौ. कोल्हे यांनी मंजुर करुन आणली पण त्याचे सर्व श्रेय कोल्हेंना जाईल या भितीपोटी या योजनेला खोडा घातला.   पण साईबाबांचा आर्शिवाद कोपरगांव मतदार संघाच्या पाठीशी आहे.  आता आमदार काळे हेच त्याचे अध्यक्ष झाले आहेत, तेंव्हा त्यांनीच या योजनेचे भूमिपुजन करून दररोज कोपरगांव शहरवासियांना प्यायला पाणी द्यावे आणि वाचलेल्या पाण्यांतुन गोदावरी कालव्यांना शेतीसाठी एक जादा पाण्यांचे आर्वतन नियोजन करावे. कोपरगांव पालिकेच्या स्थायी समितीत ९ पैकी ७ सदस्य भाजपा सेना मित्रपक्षाचे आहेत आमदार काळेंनी ज्या रस्त्यांची उदघाटने केली त्याचे ठराव व मंजु-या याच स्थायी समितीने दिल्या तर पाच नंबर साठवण तळयाचे काम करण्यांचा ठरावही राजेंद्र सोनवणे, बबलु वाणी यांनी करून त्याची ७ लाख फी देखील दिलेली आहे तेव्हा विरोधकांनी उगाचच पाच नंबरच्या साठवण तळयाबाबत जनतेत गैरसमज पसरवु नये असे कोल्हे शेवटी म्हणाले.

COMMENTS