सातारच्या जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी चार जणांवर गुन्हे नोंदविले आहेत.
सातारा / प्रतिनिधी : सातारच्या जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करत रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा शहर आणि तालुका पोलिसांनी चार जणांवर गुन्हे नोंदविले आहेत.
सातारा शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचार्यांनी शहरात जिल्हा परिषद चौकातील नेशन 11 या हॉटेलवर कारवाई करत केतन भिकू कदम (रा. बाँबे रेस्टॉरंट चौक) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचदरम्यान कोरेगाव रस्त्याला विसावा नाका येथील प्रगती चायनीज या हॉटेलवर कारवाई केली. याप्रकरणी सतीश सुरेश फरांदे (रा. सदरबझार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोडोली चौकात असणार्या विसावा चायनीज या ठिकाणावर सातारा शहर पोलिसांनी, तसेच वडूथ (ता. सातारा) येथील सेव्हन स्टार हॉटेलवर सातारा तालुका पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. याप्रकरणी सनी संजय भिसे (रा. एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर, तर सचिन विश्वासराव निकम (रा. वडूथ) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS