Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत.

सुहास कांदेंचा टोला.

नाशिक प्रतिनिधी:   सध्या आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि सुहास कांदे(Suhas Kande)  यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही बाजून

जनतेच्या पैशातून सरकारचे परदेश दौरे ः आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
आदित्य ठाकरेंविरोधात फ्री-वे परिसरात बॅनरबाजी
आमदार उदय सामंत हल्ला प्रकरण.

नाशिक प्रतिनिधी:   सध्या आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) आणि सुहास कांदे(Suhas Kande)  यांच्यातील वाद चांगलाच पेटल्याचं पाहायला मिळतंय. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. अश्यात सुहास कांदे यांनी आदित्य यांना वाघ तर म्हटलंय सोबतच त्यांना टोलाही लगावला आहे. “आदित्य ठाकरे वाघ आहेत, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खात आहेत. उद्धवसाहेब आमदार गेले पण तुमच्या आजू बाजूचे पोट भरणारे बडवे तिथेच आहेत”, असं म्हणत सुहास कांदे यांनी आदित्य यांना टोला लगावला आहे. शिवाय ठाकरेंच्या भेटी विषयी कांदेंनी आपली खंत बोलून दाखवली आहे. “आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना 100 पत्र दिली. पण एकाही पत्राला उत्तर नाही म्हणून योजना रखडल्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि दुसऱ्या दिवशी परवानगी मिळाली. माझ्या दुबईवरून आणलेल्या जाड चपला घासल्या गेल्या पण आदित्य ठाकरे काही भेटले नाहीत”, असं कांदे म्हणालेत.

COMMENTS