आज पासून अत्यावश्यक सेवा वगळून कोपरगाव राहणार बंद

Homeमहाराष्ट्र

आज पासून अत्यावश्यक सेवा वगळून कोपरगाव राहणार बंद

कोपरगाव स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिक, आस्थापना यांना कळवण्यात येते कि, कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लावणे बाबत महाराष्ट्र शासन आदेश क्र.

फलटण येथे जुगार अड्ड्यावर छापा; पावणेदोन लाखाचा मुद्देमाल जप्त
मुलांच्या लठ्ठपणाची समस्या पालकांच्या मानसिकतेशीही निगडीत – डॉ. राजेंद्र खताळ
मधुरा पिचड एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव स्थानिक प्रशासनाच्या वतीने शहरातील सर्व नागरिक, आस्थापना यांना कळवण्यात येते कि, कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी काही कडक निर्बंध लावणे बाबत महाराष्ट्र शासन आदेश क्र.DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक ४ एप्रिल २०२१ नुसार “ब्रेक द चेन” मिशन अंतर्गत दिनांक ५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२१ दरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ यादरम्यान जमावबंदी लागु राहील. ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येवू शकणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तर रात्री ८ ते सकाळी ७ यादरम्यान संचारबंदी असेल यावेळेत नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरू नये. 
शहरातील खालीलप्रमाणे सेवा सुरु व बंद राहतील
(१) वैद्यकीय सेवा / दवाखाने/ औषधी आस्थापना २४ तास सुरु राहतील.(२) किराणा, औषधी, भाजीपाला, डेअरी, खाद्यपदार्थ / स्वीट मार्ट, बेकरी आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तूची दुकाने सूर राहील. व इतर सर्व दुकाने, बाजरपेठ, मॉल्स बंद राहतील.(३) शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील. (४) सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. (५) रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी वाहतूक परवानगी असेल.(६) बँका /वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद असेल.(७) खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.(८) शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत सुरु राहतील. कोविड संबंधी उपाय योजनासह. (९) चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स, गार्डन, व्यायमशाळा पूर्णपणे बंद राहतील. (१०) सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे दर्शनासाठी बंद. बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. (११) रेस्टॉरंट / हॉटेल्स व बार पूर्णतः बंद राहतील. बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.(१२) रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर ते पूर्णपणे बंद करण्यात येईल.(१३) सर्व सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील.(१४) वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल.(१५) शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र १० वी व १२ वी  परीक्षांचा अपवाद असेल. (१६) सर्व खासगी क्लासेस बंद राहतील. (१७) उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.(१८) बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे.  केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. (१९) विवाह / लग्न कार्यक्रमास फक्त ५० व्यक्ती उपस्थितीची परवानगी कोविड संबंधी उपाय योजनासह असेल.(२०) अंत्यसंस्कार फक्त २० व्यक्ती उपस्थितीची परवानगी असेल.(२१) सोसायटी मिनी कंटेन्मेंट ५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास, ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावावे आणि बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी असेल.(२२) आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन असेल. 
सदरील आदेश दिनांक ५ एप्रिल २०२१ रोजी पासून रात्री ८ वा. पासून ते दिनक ३० एप्रिल २०२१ रात्री १२ वा. पर्यंत लागू राहतील. प्रशासनास सहकार्य करावे.

विनामास्क आढळलेल्या व्यक्तीस रू. ५०० दंड आकारनेत येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या व्यक्तीस रू. १००० दंड आकारानेत येईल. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. कोरोना लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आल्यास त्वरित शासकीय यंत्रणेस कळवावे.    असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे  तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले.

COMMENTS