Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

नाशिक शहरातील कोरोनाग्रस्त दोन रुग्णांनी बेड मिळत नसल्याने थेट ऑक्सिजन सिलेंडर सह नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते.

Kalyan : पोलिसांच्या गाडीने घेतला पेट… (Video)
भाईंदर रेल्वे स्थानकात बाप-लेकाची आत्महत्या
अंबाजोगाईत अडखळत बोलणार्‍या मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

नाशिक : नाशिक शहरातील कोरोनाग्रस्त दोन रुग्णांनी बेड मिळत नसल्याने थेट ऑक्सिजन सिलेंडर सह नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले होते. मात्र, यातील एका रुग्णाचा शहरातील बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या कोरोना पॉझिटिव्ह दोन्ही रुग्णाना आंदोलनात घेऊन येणाऱ्या नाशिक मधील सामाजिक कार्यकर्त्या विरोधात नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये काल दोन कोरोना रुग्णांना शहरातील हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला नाही. सिडकोच्या कामटवाडा येथील राहणारे संबंधीत कोरोना रूग्ण शहरातील अनेक रुग्णालये फिरले. मात्र, त्यांना कोठेही ऑक्सीजन बेड मिळत नसल्याची त्यांची तक्रार होती. यामुळे दिवसभर फिरून वैतागलेले त्यांचे नातेवाई आणि सामाजिक कार्यकर्ते दिपक डोके हे संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ऑक्सिजन सिलेंडर हातात घेऊन रुग्णासमवेत नाशिक महानगरपालिका मुख्यालय आले. पालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांनी बेड मिळत नसल्याने गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून मनपाच्या बिटको रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. मात्र, यातील एका रूग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अत्यंत संसर्गजन्य परिस्थिती असताना आंदोलनासाठी रुग्णाचा वापर केल्याप्रकरणी दीपक डोके या सामाजिक कार्यकर्त्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS