अहमदनगर शहरात दहशतीचे वातावरण… सावेडीत जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर शहरात दहशतीचे वातावरण… सावेडीत जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत

अहमदनगर (प्रतिनिधी)-  जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी व काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गुरुवारी (दि.14 ऑक्टोबर) सकाळी

Sangamner : सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यावर कारवाई करा (Video)
डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार… ‘असा’ घडला थरार… (Video)
सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

जागा खाली करण्याची सुपारी घेऊन एक राजकीय महिला पदाधिकारी व काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी गुरुवारी (दि.14 ऑक्टोबर) सकाळी पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका खासगी जागेचा ताबा घेण्यासाठी जेसीबीने संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार तोडून जागा खाली करण्यासाठी भटक्या विमुक्त समाजातील कुटुंबियांवर दहशत माजवली. सदर व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने युवकचे जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. 

सदर प्रश्‍नी काही दिवसांपुर्वी आरपीआयच्या वतीने उपोषण देखील करण्यात आले होते, मात्र संबंधितांवर कारवाई झाली नसल्याने त्यांचे धाडस वाढून त्यांनी कायदा हातात घेतला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर आरपीआयच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट केले आहे.  

सावेडी, पाईपलाईन रोड, समर्थ नगर येथील एका जागेत राम माने व लक्ष्मण माने अनेक वर्षापासून राहत आहे. मोलमजुरी आणि रखवालीचे काम करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. काही महिन्यांपासून शहरातील तथाकथित राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेली गुंड प्रवृत्तीच्या महिलेने ही जागा खाली करुन घेण्याची जागा मालकाकडून सुपारी घेतली असून, माने कुटुंबीयांना सदर जागा खाली करण्यासाठी सदर महिला व गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. जेसीबी लावून घर पाडून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्यानंतर आरपीआयच्या वतीने पोलीस अधिक्षकांकडे तक्रार करुन उपोषण करण्यात आले होते. 

मात्र याची दखल घेतली न गेल्याने सबंधितांनी जेसीबी लाऊन जागा खाली करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार महिला गर्भवती असून, तिला व कुटुंबीयांना घर खाली करण्यासाठी वारंवार धमकवले जात आहे. घर खाली करण्यासाठी धमकावणार्या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करुन पिडीत कुटुंबीयांना राहत्या घरातून बेघर होण्यापासून वाचविण्यासाठी सदर कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे व अनाधिकृतपणे जेसीबीने संरक्षक भिंतीचे प्रवेशद्वार तोडून जागा खाली करण्यासाठी दहशत निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे.  

COMMENTS