अहमदनगर जिल्हा कामगार संघटना राबविणार दत्तक योजना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा कामगार संघटना राबविणार दत्तक योजना

अहमदनगर प्रतिनिधी -  गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट मानवी जीवनावर ओढविले आहे.यामध्ये संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे अने

श्रीगोंदा तालुका योग संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे
खेड विद्यालयाच्या प्राचार्यपदी गोरक्ष भापकर
पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…

अहमदनगर प्रतिनिधी – 

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे महाभयंकर संकट मानवी जीवनावर ओढविले आहे.यामध्ये संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे अनेकांच्या हाताचे काम गेले आहे त्यामुळे अनेक कामगारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कामगार झटत आहे त्यामुळे आपल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.यांच दृष्टिकोनातून गरिब-गरजूंवंत कामगारांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळून शालेय जीवन चांगले होण्यासाठी एमआयडीसीतील पाच कामगारांच्या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या वतीने घेण्यात आला.भविष्यात यातही वाढ करण्यात येईल अशी माहिती अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे. यामध्ये गरजूवंत कामगारांच्या पाच मुलांना बारावीपर्यंत मोफत संपूर्ण शिक्षणाचा खर्च संघटना करणार आहे तसेच केडगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले,अन्नछत्र या ठिकाणी अन्नदान करण्यात आले तसेच गरजूवंतांना किराणा किटचे वाटप करण्यात आले असून यावेळी विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

COMMENTS