अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध कत्तलखान्यांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

संगमनेर : प्रतिनिधी संगमनेर शहरात दोन दिवसांपूर्वी अवैध गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या कारवाईनंतर राज्यभरात संगमनेरचे नाव बदनाम झाले आहे. गोवंश जना

Ahmednagar : आ.संग्राम जगताप यांची आयटी पार्कला भेट
कोळपेवाडी महेश्‍वर यात्रा महोत्सव जल्लोषात
अग्नीपथचा अग्नीडोंब…नगरच्या रेल्वेने मागितला पोलिसांना बंदोबस्त

संगमनेर : प्रतिनिधी

संगमनेर शहरात दोन दिवसांपूर्वी अवैध गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या कारवाईनंतर राज्यभरात संगमनेरचे नाव बदनाम झाले आहे. गोवंश जनावर तस्करी आणि मांस विक्री करणाऱ्या अवैध व्यवसाय ताबडतोब बंद करून त्यांना अभय देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज सोमवार दि.४ रोजी शहरासह तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. 

संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शेकडो सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. यावेळी शहरातील अवैध गोवंश व्यवसाय करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असून नगरपालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आली आहे. 

तसेच या अवैध व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि त्याचा वाटा उचलणारे पोलीस प्रशासन यासगळ्यामुळे आज राज्यभरात संगमनेरची बदनामी झाली आहे. त्यामुळे अवैध कत्तलखान्यांवर वारंवार कारवाई होऊनही हे व्यवसाय पुन्हा सुरु राहतात. याविषयी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. 

तसेच या व्यवसायात असलेल्या सराहीत गुन्हेगारांची नोंद घेऊन त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना ताबडतोब कारवाईचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून न मिळाल्याने हे आंदोलन पुन्हा उद्या सुरु ठेवण्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. 

तसेच उद्या मंगळवार दि.५ रोजी संगमनेर बंडाची हाक यावेळी देण्यात आली आहे. या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पतित पावन संघटना, राष्ट्रीय बजरंग दल यासह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदवला. 

COMMENTS