अभिनेत्यांनी हाकललेल्या लेकरावर नगरमध्ये झाली शस्त्रक्रिया

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्यांनी हाकललेल्या लेकरावर नगरमध्ये झाली शस्त्रक्रिया

माऊलीच्या पुढाकाराने साईदीपने केली मदतअहमदनगर/प्रतिनिधी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सलमान खान व गोविंदा यांच्याकडे याचना करूनही त्यांनी ह

भर पावसात केले पुण्यातील नेत्यांनी मनसेच्या शाखेचे केले उदघाटन
घोगरगाव वीज सबस्टेशनला मंजुरी; नामदार तनपुरे यांनी दिले आदेश
सावधान…कोरोना पुन्हा हात-पाय पसरतोय…;

माऊलीच्या पुढाकाराने साईदीपने केली मदत
अहमदनगर/प्रतिनिधी-हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सलमान खान व गोविंदा यांच्याकडे याचना करूनही त्यांनी हाकलून दिलेल्या जानू (जान्हवी) या बालिकेवर नगरमध्ये यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. येथील माऊली सेवा प्रतिष्ठानने पुढाकार घेतल्याने साईदीप रुग्णालयात ही शस्त्रक्रिया नुकतीच झाली.
याबाबतची माहिती अशी की, नयना नावाची महिला आपली तीन लेकरं आणि छोट्या बहिणीला घेऊन रस्तोरस्ती फिरत होती. कुणीतरी तिला सांगितलं की, मुंबईला सलमान खान नावाचा नट राहतो. तो गोरगरीबांना औषध उपचाराला मदत करतो. त्यामुळे दहा दिवसाच्या तान्ह्या लेकराला घेऊन ती दुरून कुठूनतरी मोठा रेल्वेचा प्रवास करून मुंबई मायानगरीत थेट सलमान खान या नटाच्या दारी जाऊन बसली. तो आज भेटेल, उद्या भेटेल अशी वाट पाहत व अपेक्षा करता करता दहा दिवस गेले. शेवटी त्याच्या बॉडीगार्ड्सनी तिला हाकलून लावले. त्यामुळे हा बडा नट तिच्यादृष्टीने कचकड्याचा ठरला.
त्यानंतर ती तशीच मुंबईत भटकत राहिली. कधी कुणी दिलं खायला तर खाल्लं, नाहीतर उपाशी तीही आणि तिची लेकरं व बहीणही. असेच फिरता फिरता मग तिला कधीतरी गोविंदा नावाचा नट मॉर्निंग वाकला जाताना भेटला. हिनं त्याला सगळं सांगितलं. लेकराच्या हृदयात छिद्र आहे व ऑपरेशनसाठी मदत करा म्हणून विनवलं. त्याने दोन-तीन हजार रुपये देऊन तिला कटवलं. मग ती मुंबईच्या एका मोठ्या सरकारी इस्पितळात गेली. हिच्याकडे भारताची नागरिक म्हणून सिद्ध करण्यासाठी काही कागदं नव्हती. त्यामुळे त्यांनीही हाकलून लावलं.

वेदनेचे चित्रीकरण, अन…
मग ती उदासवाणे मुंबईतच एका चर्चसमोर बसली. त्यावेळी तिच्या वेदनेचे चित्रीकरण करून व फोटो काढून ते सोशल मिडियावर इकडे तिकडे पाठवण्याचे सामाजिक कार्य काही लोक करत होते. सुदैवाने असाच तिच्या दुःखाचा व्हिडीओ नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे पालक हर्षल मोर्डे यांच्यापर्यंत पोचला आणि त्यांनी तिला आणि मुलांना माऊली संस्थेच्या घरात पोचवलं. त्यानंतर हा सगळा परिवार माऊली परिवारात सामावून गेला. दरम्यान कोरोना काळात दोन वर्षे निघून गेली. पण हृदयाला छिद्र असलेल्या मुलीला आता त्रास होऊ लागला होता. ऑपरेशन करणे गरजेचे झाले होते. तिच्या या मुलीचं म्हणजे (जान्हवी ) जानूच हे ऑपरेशन अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात प्रसिद्ध बाल हृदयरोग तज्ज्ञ कर्नल डॉ. प्रभातकुमार यांनी केलं. तिला डिस्चार्ज देताना तिच्या या नव्या जन्माचं साईदीपच्या डॉक्टरांनी केक कापून स्वागत केलं. नयना आणि तिच्या लेकराचं भारतीय नागरित्व सिद्ध करण्यास तसे परिश्रम खूप झाले. परंतु शिंगव्याचे तलाठी बेल्हेकर, ग्रामसेवक पुंड, तहसीलच्या पुरवठा विभागाचे कुंभार आणि नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्या सहकार्याने ते शक्य झाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत ही शस्त्रक्रिया बसवता आली. साईदीप रुग्णालयाचे डॉ. मुनोत, डॉ. शेळके, डॉ. कटारिया आदींनी या कामी मदत केली. साईदीपचे संचालक डॉ. किरण दीपक यांनी त्यांच्या साईदीप ट्रस्ट मधून हे ऑपरेशन मोफत करण्याचे ठरवले होते. मात्र, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून हे उपचार झाल्याने आता डॉ. दीपक यांनी माऊली संस्थेतील गंभीर आजारी माता-भगिनींना कुठल्याही वैद्यकीय मदतीची गरज भासल्यास, ती केली जाईल, अशी ग्वाही दिली आहे.

माऊलीच्या पाठपुराव्याचे कौतुक
नगर-मनमाड महामार्गावरील शिंगवे नाईक येथे माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे दाम्पत्य मनोविकलांग महिला व त्यांच्या मुलांवर उपचार व त्यांचा सांभाळ करतात. नयना या महिलेच्या मुलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी डॉ. धामणे यांनी खूप धावपळ व पाठपुरावा केला. त्यांच्या या कष्टाला फळ आले. माऊली संस्थेच्या मनगाव आणि इंद्रधनू प्रकल्पात सध्या 360 माता भगिनी व त्यांची इथेच जन्मलेली 30 मुले कायमस्वरूपी राहात आहेत. मनोविकलांगतेतून बर्‍या झालेल्या व कुटुंबियांनी न स्वीकारलेल्या महिलांचे आता माऊली हेच घर झाले आहे व या महिलांनी उदबत्ती तसेच डिझाईनच्या बांगड्या व अन्य छोट्या-मोठ्या व्यवसायांतून स्वावलंबनाच्या वाटेवर यशस्वी प्रवास सुरू केला आहे.

COMMENTS