अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाणीचा गुन्हा दाखल

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/ प्रतिनिधी- मार्बल दुकानदाराला दोन लाखाची खंडणी मागितली व खंडणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण करून पिस्तुल

Ahmednagar : कोठला व हवेली परिसरात सवार्यांचे दर्शन पूर्णपणे बंद l Lok News24
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या दोघांना पकडले ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खासगी रुग्णालयांकडील लस साठयात होणार कपात l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/ प्रतिनिधी- मार्बल दुकानदाराला दोन लाखाची खंडणी मागितली व खंडणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी त्याचे अपहरण करून पिस्तुलाचा व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून त्याच्या बँक खात्यातून एक लाख 31 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले तसेच त्याच्या खिशातील 93 हजार रुपये काढून घेतले. ही घटना पारनेर तालुक्यातील गणेश खिंड घाट येथे घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की सुरेशकुमार कुमावत (राहणार अर्जुननगर, राजस्थान) यांचे साई मार्बल नावाचे दुकान पारनेर येथे सुपा रोडवरील सिव्हील हॉस्पिटलसमोर आहे. कुमावत यांना गणेश कावरे, संग्राम कावरे (दोघे राहणार वरखेड मळा, पारनेर) व त्यांचे अन्य चार साथीदार यांनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून त्यांचे अपहरण करून त्यांना नंबर नसलेल्या इनोवा कारमधून गणेश खिंड घाट येथे नेऊन बेदम मारहाण केली. पिस्तुलाचा व लाकडी दांडक्याचा धाक दाखवून फोन पेवरून गणेश कावरे याने कुमावत यांच्या बँक अकाउंटवरून एक लाख 31 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि त्यांच्या खिशातील 93 हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. याबाबत कोणाला काही सांगितले किंवा पोलिसात फिर्याद दिल्यास पत्नी व मुले यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच दर महिन्याला दहा हजार रुपयाची खंडणीची मागणी केली. या त्रासाला कंटाळून कुमावत हे राजस्थानला निघून गेले व त्यांनी तेथून पोस्टाने पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत वरिष्ठांशी फोन करून तक्रारीची शहानिशा करून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक उगले करीत आहेत.

COMMENTS