अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबवा : डॉ.राजेंद्र शिंगणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबवा : डॉ.राजेंद्र शिंगणे

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून 'अन्न

ट्रिपल टेस्टसाठी पार्लमेंटला घेराव घालावा का !
 मुंबईतील चित्रपट नगरी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री पळवून नेतील-  आमदार रोहित पवार 
मुंबईकरांची डबल डेकर बस होणार हायटेक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबविण्याचे विभागाने नियोजन  करावे असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिले.         

मंत्रालयातील दालनात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमांच्या जनजागृतीबाबतच्या नियोजनासंदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त परिमल सिंह, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक माहिती व प्रशासन गणेश रामदासी यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.        मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले,औषधे खरेदी करताना,हाताळताना व प्रत्यक्ष वापरताना घ्यावयाच्या काळजीबाबत सर्व साधारण माहिती ग्राहकांना उपलब्ध झाली पाहिजे.सध्या सणांचा कालावधी आहे अशा वेळी अन्न भेसळीची घटना देखील घडत असतात अशा वेळी अन्न भेसळ प्रती  देखील जनजागृती व्हावी यासाठी अन्न भेसळ कशी ओळखावी याबाबत जनजागृती होणे  गरजेचे आहे.अन्न व सुरक्षा मानके प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या योजना,रेल्वे स्टेशन नजीकचा परिसर,खाऊ गल्ली,भाजीपाला व फळबाजार आदी विविध ठिकाणी अन्न व मानके कायद्यातंर्गत अन्न सुरक्षितेबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे.सध्या सोशल मीडियाचा वाढता वापर बघता त्यावर भर देवून प्रचार व प्रसिध्दीचे उपक्रम राबविण्यात यावेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून मुद्रीत,इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया तसेच सर्व माध्यमांव्दारे प्रसिध्दी करण्यावर भर देण्यात यावा अशा सूचनाही मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केल्या.यावेळी विभागामार्फत अन्न व औषध प्रशासन,अन्न  सुरक्षा व मानके कायदा व औषध विभागाची माहिती व उपक्रमांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

COMMENTS