अनिल देशमुखांविरोधात ’ईडी’पुढे जयश्री पाटलांचा जबाब

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल देशमुखांविरोधात ’ईडी’पुढे जयश्री पाटलांचा जबाब

माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी ’ईडी’ने आज अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. सुमारे चार तास पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. या वेळी त्यांनी ’ईडी’ला अनेक पुरावे दिले आहेत. तसेच ’ईडी’च्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.

सरपंच परमीटरूम, उपसरपंच हॉटेल नावाला हरकत : किरण अंत्रे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
खडसेंसाठी इकडे आड तिकडे विहीर !
दीड कोटींचे बनावट हॉलमार्क असलेले सोने जप्त

मुंबई / प्रतिनिधी: माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी ’ईडी’ने आज अ‍ॅड. जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. सुमारे चार तास पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला. या वेळी त्यांनी ’ईडी’ला अनेक पुरावे दिले आहेत. तसेच ’ईडी’च्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे पाटील यांनी ’ईडी’ला नेमके कोणते पुरावे दिले, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर यांनी केला होता. या प्रकरणी पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची दखल घेत ’सीबीआय’ने या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणी आज ’ईडी’ने पाटील यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार पाटील या सकाळी 11 वाजता ’ईडी’ कार्यालयात आल्या. सुमारे चार तास त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. मला ’ईडी’ने प्रश्‍न उत्तर स्वरुपात माहिती विचारली. ’ईडी’च्या सर्व प्रश्‍नांना मी उत्तरे दिली आहेत. त्यांना अनेक पुरावे दिले आहेत. ज्या लोकांकडून पैसे गोळा केले जात होते, त्यांची माहिती दिली आहे, असे पाटील म्हणाल्या. आज चार तास माझा जबाब नोंदवण्यात आला; परंतु, माझा जबाब आज पूर्ण झालेला नाही. मला पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले जाणार आहे. जेव्हा बोलावले जाईल, तेव्हा मी पुन्हा ’ईडी’च्या कार्यालयात जाऊन सहकार्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

COMMENTS