अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- सिविल हॉस्पिटल मध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत दोषी अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विश

दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल
श्रीनागेश्‍वर पालखी सोहळा जामखेडला उत्साहात
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

अहमदनगर (प्रतिनिधी)-

सिविल हॉस्पिटल मध्ये घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत दोषी अधिकाऱ्यांवर सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विश्व मानव अधिकार परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देताना विश्व मानव अधिकार परिषदेचे अल्पसंख्यांक जिल्हाअध्यक्ष अल्ताफ शेख, जिल्हा अध्यक्ष अज्जू शेख, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, नगर तालुका शहराध्यक्ष अरुण कोंडके, महाराष्ट्र सचिव शफीबाबा सय्यद, मुक्ती अल्ताफ मोमीन आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे घडलेल्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झालेली असून निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत परंतु या प्रकरणी नाशिक येथे सेंटरला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर विश्व मानवाधिकार परिषदेच्यावतीने त्याच वेळी 30 एप्रिल रोजी हॉस्पिटलचे स्ट्रक्चर फायर ऑक्सिजन याबाबतची पाहणी ऑडीट करण्याबाबतचे निवेदन दिले होते परंतु सदरील निवेदनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही अशी शंका निर्माण होत आहे जर सदरील निवेदनावर योग्य कारवाई झाली असती तर आज ही घटना कदाचित घडली नसती. 

तरी निवेदनावर योग्य ती कारवाई करण्यात येऊन सदर घडलेल्या घटनेस कारणीभूत असलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येऊन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच सदरील आगीमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांस शासनाने मदत जाहीर केली असून ती अधिक जास्त मदत करून लवकरात लवकर देण्यात यावी व जर या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर विश्व मानवाधिकार परिषदेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS