अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन

अहमदनगर- प्रतिनिधी येथिल "हरियाली" संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संरक्षण विभागाच्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रारंगणा

Sangamner : सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांच्यावर कारवाई करा (Video)
कोरोना उपाययोजनांना पहिले प्राधान्य : नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी घेतला पदभार
काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र काम करणार

अहमदनगर- प्रतिनिधी

येथिल “हरियाली” संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त संरक्षण विभागाच्या रणगाडा संग्रहालयाच्या प्रारंगणात   पद्मभुषण आण्णासाहेब हजारे यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे फुल असा बहुमान लाभलेल्या “तामण” वृक्षांची लागवड करुन स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकनां अभिवादन करुन “हुतात्मा वृक्षाची” लागवड करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधुन करण्यात आला.

या वेळी आण्णा हजारे यांनी हरियाली संस्था पर्यावरण रक्षण व व्यापक वृक्षलागवड ,संवर्धनासाठी करीत असलेल्या कृतिशिल कार्याचे कौतुक करुन प्रामाणीक नागरीक आणी  कृतिशिल काम करणा-या सामाजीक संस्था हे देशाचे बलस्थान असल्याचे सांगीतले. 

हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी यावेळी माहीती देताना सांगीतले की  स्वातंत्र्याच्या ७५ व्या  वर्षानिमित्त नगर शहरातील महत्वाच्या सार्वजनिक जागेवर “तामण” या  ७५ वृक्षांची लागवड करण्यात येत असुन स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या क्रांतीविरांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे कार्य या वृक्षांच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याचे सांगीतले. 

यावेळी संरक्षण विभागाचे अधिकारी नरेंद्र सिंग,राजबिर सिंह,अटल वामन उपस्थित होते. या उक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुलसिराम पालीवाल, विष्णु नेटके,योगेश गायकवाड,ठाकुरदास परदेशी, संदिप पावसे,दिपक परदेशी,यश सामल,संजय राहुरकर आदी परिश्रम घेत आहेत.

COMMENTS