अडचणीत येण्याच्या भीतीने फडणवीस घाबरले : मलिक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अडचणीत येण्याच्या भीतीने फडणवीस घाबरले : मलिक

वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

तलवार घेवून व्हिडिओ बनवणे महागात
महुआ मोइत्रा यांची खासदाकी रद्द
राजकीय कटूता संपणार का ?

मुंबई/प्रतिनिधीः वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. शुक्ला यांच्या अहवालावर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केल्यानंतर फडणवीस यांनी पुन्हा लक्ष्य केले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी हा अहवाल तयार केल्याचे फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या आरोपांना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीसांचे आरोप चुकीचे असून या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्याने जवळच्या व्यक्ती अडचणीत येतील, म्हणून फडणवीस घाबरले, असा आरोप मलिक यांनी केला आहे. 

शुक्ला यांचा अहवाल मलिक यांनी सार्वजनिक केला, असे फडणवीस सांगत आहेत; मात्र ते स्वतः च शुक्ला यांच्या पत्राच्या आधारावर दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सरकारवर आरोप करत होते. मुंबईतही पत्रकार परिषद घेतली आणि बदल्यांमध्ये पैसे खाल्ले असे आरोप करत होते. केंद्रीय गृह सचिवांना व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही ते भेटले. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी सांगितलेला  शुक्ला यांचा अहवाल काय आहे? बेकायदेशीर फोन टॅपिंग केले, असे सांगून मलिक म्हणाले, की महाराष्ट्र पोलिस दलामध्ये बदल्या होत राहतात. पोलिस मंडळाच्या अध्यक्षतेखाली या बदल्या होतात; पण फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचे काम केले, अशी टीका मलिक यांनी केली. मलिक यांनी अहवाल फोडला असे फडणवीस सांगत आहेत; परंतु गुन्हा दाखल झाल्यावर का घाबरत आहेत? चोरी झाली नाही अशी बोंबाबोंब फडणवीस करत आहेत. अफवा पसरवून लोकांना बदनाम करत आहेत. आम्ही सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत नाही. कारण आमचे सरकार खंबीरपणे उभे आहे. फडणवीस हे रश्मी शुक्ला यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कटकारस्थान आखत होते. त्या अहवालात काय आहे? ऑगस्टमध्ये हा अहवाल सादर झाला, तेव्हा कुठलीही बदली झालेली नाही. फडणवीसांनी तो 6.3 जीबीचा डेटा दाखवावा. भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. भाजपचे नेते आपल्या जवळच्या अधिकार्‍यांना हाताशी धरत कट रचत आहेत. तीन महिन्यात सरकार पडेल, आमदार फुटतील, अशा वल्गना केल्या त्याचे काय झाल? राष्ट्रपती राजवट लागेल अशी बोंबाबोंब करतात, अशी कडवट टीका करताना तसे काही होणार नाही. सरकारवर लोकांचा विश्‍वास आहे, असा विश्‍वास मलिक यांनी व्यक्त केला

COMMENTS