अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात

संगमनेर/प्रतिनिधी।२२ भव्य-दिव्य आणि इतक्या आनंदात असा वाढदिवसाचा कार्यक्रम क्वचितच पाहायला मिळतो. याचे कारणही तसेच असून, युवा नेतृत्व अजय फटांगरे

श्रीरामपूर हे वाचन संस्कृतीचे माहेरघर होय ः डॉ. बाबुराव उपाध्ये              
राष्ट्रवादीने कायम पाण्याबाबत भेदभाव केला : राम शिंदे
खाजगी सावकाराची पोलीसांकडून पाठराखण

संगमनेर/प्रतिनिधी।२२

भव्य-दिव्य आणि इतक्या आनंदात असा वाढदिवसाचा कार्यक्रम क्वचितच पाहायला मिळतो. याचे कारणही तसेच असून, युवा नेतृत्व अजय फटांगरे यांनी आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्वातून पठारभागासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे. या प्रेमापोटीच हा सोहळा व्यापक स्वरुपात साजरा होत असल्याचे गौरवोद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.

जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांचा वाढदिवस कर्जुले पठार येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात गुरुवारी दि.२१ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. किरण लहामटे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, साई संस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. सुहास आहेर, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, मीरा शेटे, आर. एम. कातोरे, मिलिंद कानवडे, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, उपसभापती नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते. प्रारंभी फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणा देण्यात आल्याने परिसर दुमदुमून गेला होता. त्यांनतर सहकुटुंब केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी स्थानिक व बाहेरुन आलेल्या मान्यवरांची सत्कारासाठी अक्षरशः रीघ लागली होती.

यावेळी बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, शाळेत अतिशय हुशार असल्याने समाजकारण आणि राजकारणात अजयने वेगळा ठसा उमटविला. बोटा गटातून जिल्हा परिषदेसाठी दिलेली संधी सार्थ ठरवून पठारभागात विकासकामांचा डोंगर उभा केला असल्याचे सांगून, जिल्हा परिषदेतील कामाचा गौरव केला. याचबरोबर सत्यजीत तांबे, जयहिंद लोकचळवळ, यशोधन आदिंच्या माध्यमातून सदैव मदतीसाठी तत्पर असणारा नेता म्हणूनही परिसरात चांगलाच संपर्क वाढविला आहे. पहिल्यापासूनच संघटन कौशल्य अंगी असल्याने आजमितीला सर्वत्र युवकांचे जाळे निर्माण केले आहे. विशेष म्हणजे आमच्या निवडणुकांत अजय कायमच मोठी भूमिका निभावत असल्याची कौतुकाची थाप दिली.

आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, एखाद्या आमदाराला लाजवेल इतके मोठे काम जिल्हा परिषद सदस्य असलेले अजय फटांगरे यांनी केले आहे. आजच्या भव्य-दिव्य कार्यक्रमातून नेमका कोणाचा कार्यक्रम होतो अशी विरोधकांना कोपरखळी मारुन पठारभागासह इतर भागांतील लोकांमध्येही त्यांनी अढळ स्थान निर्माण केले असल्याचे अधोरेखित केले. यापुढे देखील पठारभागाच्या विकासासाठी मी आपल्या सोबत असेल, असा विश्वास यानिमित्ताने आमदार लहामटे यांनी दिला. 

सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे म्हणाले, की सर्व मित्रांनी मोठे कष्ट घेतल्याने आज माझा वाढदिवस साजरा झाला आहे. सभापती झाल्यामुळे तालुक्यासह पठारभागात विकासकामे करता आली. साहेब हे स्वतः एक ब्रँड असल्याने त्यांनी ज्यांना ज्यांना हात लावला त्यांचा सोने झाले आहे. पठारभागाने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. यापुढे देखील मी सदैव आपल्या सेवेत असेल, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला. यावेळी कार्यक्रमास तोबा गर्दी झाली होती. सत्कारासाठी रीघ लागलेल्या मान्यवरांकडून आणि समर्थकांकडून उशिरापर्यंत सत्कार स्वीकारले. मिष्टान्न भोजनानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS