अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजब गाढवाची गजब कथा.. अंत्यविधि, सावडणे, श्राध्द विधीला जाणारे गाढव !

गावात कोणाचा मृत्यू झाल्यास लोकांची गर्दी पाहीली की एक गाढव गर्दीत सामिल होते. अंत्ययात्रेबरोबर स्मशान भूमित जाऊण अंत्यविधी होईपर्यंत तेथेच लोकांच्या

Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)
Paranda : डोमगावात आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती साजरी (Video)
Osmanabad : परंडा येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (Video)

गावात कोणाचा मृत्यू झाल्यास लोकांची गर्दी पाहीली की एक गाढव गर्दीत सामिल होते. अंत्ययात्रेबरोबर स्मशान भूमित जाऊण अंत्यविधी होईपर्यंत तेथेच लोकांच्या गर्दीत थांबते. तसेच ते सावडणे, श्राध्द विधीलाही माणसात मिसळून स्मशानभूमीपर्यंत जाते. नंतर सर्वांसोबत गावात परत येते. या अजब गाढवाच्या गजब कारनाम्यामुळे हे गाढव चर्चेचा विषय ठरले आहे.

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ज्ञानोबाा कुंभार यांच्या मालकीचे हे गाढव आहे. गाढवाच्या या आशा वागणूकीमुळे गावकऱ्यांबरोबरच अत्यविधिला येणाऱ्या पाहुण्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. तर गाढव अंत्यविधीला आल्याचे पाहील्यास उपस्थितांत उलट सुलट चर्चा होत आहे. गाढव अंत्यविधीला येते पण कुंभार येत नाही, आशी बोलणीही गाढवामुळे ऐकूण घ्यावी लागत असल्याचे लहू कुंभार म्हणतात.

ज्ञनोबा कुंभार व त्यांचा मुलगा लहू कुंभार यांनी एक ते दिड वर्षापूर्वी नाातेवााईकाकडून ५ हजार रुपयाला गाढवाचे शिंगरू विकत घेतले होते. गाढव लहाण असल्याने त्याला गावाच्या कडेला चरण्यासाठी मोकळे सोडण्यात येत. ते गाढव रोज गावभर फिरते. गावात कोठे गर्दी किंवा जमाव दिसला की ते चरण्याचे सोडून गर्दीत सामील होते. मागील सहा महीण्यात त्याने अनेक अंत्यविधिला हजेरी लावली आहे. गाढवाच्या आशा वागण्यामुळे त्याला शेतात बांधून ठेवण्याचा विचार आसल्याचे लहू कुंभार यांनी सांगतले. आजपर्यंत आपण गाढवाच्या आनेक कथा ऐकल्या असतील परंतू माणकेश्वर येथील हे अश्चर्यकारक गाढव पंचक्रोशत चर्चेचा विषय झाला आहे.

COMMENTS